Murder अंगणात खाटेवरच केली माय-लेकीची निर्घूण हत्या

Murder अंगणात खाटेवरच केली माय-लेकीची निर्घूण हत्या

धुळे - प्रतिनिधी dhule

तरवाडे (ता.धुळे) येथे माहेरी आलेल्या मुलीसह तिच्या आईची निर्घूण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

दोघींचे मृतदेह अंगणात खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. चंद्रभागा भावराव महाजन (वय 65 रा.तरवाडे ता.धुळे) व वंदनाबाई गुणवंत महाले (वय 45 रा.कासोदा, (kasoda) अडगाव ता.एरंडोल) अशी दोघींची नावे आहेत.

वंदनाबाई ही दोन महिन्यांपासून तरवाडे हे माहेरी आलेली होती. तिची आई चंद्रभागा यांचे तरवाडे गाव शिवारात चाळीसगाव (chalisgaon) रोडलगत पत्र्याचे शेडमध्ये राहत होती. दोघी रात्री अकरा वाजता बाहेर खाटेवर झोपल्या. सकाळी मात्र दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या.

रात्रीतूनच त्याची निर्घूण हत्या करण्यात आली. (Upper Superintendent of Police Prashant Bachhav) अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, (lcb) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, तालुका पोलिसत ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. खुनाचे कारण समजू शकले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com