आदिवासी आश्रळशाळेत परस्पर पदभरती, विश्वस्तावर गुन्हा

आदिवासी आश्रळशाळेत परस्पर पदभरती, विश्वस्तावर गुन्हा
Crime

पिंपळनेर । Pimpalner

आदिवासी आश्रमशाळेत परस्पर पदभरती करत शासनाची व संस्थेची फसवणूक करणार्‍या विश्वस्तावर पिंपळनेर (Pimpalner) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिंपळनेर (Pimpalner) येथील साक्री तालुका आदिवासी सेवा मंडळ, या संस्थेचे विश्वस्त शिवजी जगन्नाथ थानक (वय 75 रा. वर्धाने ता. साक्री) याच्या फिर्यादीनुसार, संस्थेचा विश्वस्थ मंगलदास नंदलाल भवरे (वय 70 रा. मळगाव) याने संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासविण्यासाठी अधिकार बाह्य खोटे लेटर पॅड (False letter pad) व संस्थेचे बनावट शिक्के ( Fake stamps of the organization) मारून संस्थेच्या डांगशिरवाडे येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत उत्तम निमजी मावची व दिनेश दिलीप राऊत यांना माध्यमिक शिक्षक तर धनंजय लोटन सोनवणे यांना शिपाई, महेंद्र भिमसिंग वसावे यांना कामाठी म्हणून संस्थेमध्ये नियुक्त केले.

बनावट लेटर पॅडवर संस्थेचे अध्यक्ष असल्याचा बनावट शिक्का (Fake stamps) मारून त्यांना नियुक्ती दिली. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तसेच मुख्याध्यापकांना बनावट अहवाल सादर करून संस्थेची व शासनाची फसवणूक केली.

Related Stories

No stories found.