भिक मागितल्याच्या रागातून एकाचा खून;आरोपीला अटक

शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील घटना
भिक मागितल्याच्या रागातून एकाचा खून;आरोपीला अटक

धुळे-प्रतिनिधी dhule

शिरपूर (shirpur) तालुक्यातील होळनांथे येथे भिक मागण्याचा रागातुन काठीने मारहाण करत एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून (police) पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

याबाबत रामसिंग आरश्या पावरा याने थाळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चैन्या आरश्या पावरा (वय 55 रा. अमरिश नगर, होळनांथे ता.शिरपूर) हा गुरूवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास कालु गणपत पावरा (वय 30 रा. अमरिश नगर) याच्या घरी भिक मागण्यासाठी गेला होता.

त्याचा राग येवून कालू याने लाकडी काठीने चैन्या याच्या डोक्यावर, तोंडावर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने जागेवरच कोसळला. त्यानंतरही कालु याने त्यांच्या घरासमोरून काही अंतरावर ओढत नेवून गटारीजवळ जखमी अवस्थेत सोडून दिले. या मारहाणीमुळेच गंभीर जखमी होवून चैन्या पावरा याचा मृत्यू झाला. त्यानुसार एकावर भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. तपास सपोनि उमेश बोरसे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com