धुळ्यात भरदिवसा तरुणाची हत्या

धुळ्यात भरदिवसा तरुणाची हत्या

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरातील अंबिका नगरात काल भर दिवसा तरूणाची हत्या (Murder of a young man) करण्यात आली. हातपाय बांधून (tying the limbs) त्याला हत्यारांनी मारहाण (Beating) करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जावेदअली शौकतअली सैयद (वय 36 रा. मुस्लीमनगर, मुन्शी मशीदजवळ, धुळे) असे मयताचे नाव आहे. या घटनेमुळे शहर हादरले.

याबाबत भिकनअली लियाकत अली सैय्यद (रा. मुस्लीमनगर) यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, काल सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेदरम्यान जुनेद सलीम, तौसिफ कपाशी, शोएब उर्फ बबल्या सर्व (रा. धुळे) व एक साथीदार यांनी अज्ञात कारणावरून (unknown reasons) जावेदअली सैय्यद याचे रूमालाने हातपाय बांधून (tying the limbs) त्याला पाठीवर, पोटावर व हातापायांवर लाकडी दांडक्याने व लोखंडी हत्यारांनी मारहाण (Beating) केली. गंभीर जखमी करून त्याचा खून (Murder) केला.

अंबिका नगर भागातील सना स्कुल समोरील एका पत्र्याच्या शेडमधील खाटेवर तो मृतावस्थेत आढळून आला. वरील चौघांवर भादंवि 302, 34 प्रमाणे गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जुनेद सलीम शेख (वय 22) व तौसिफ शाह उर्फ तौसिफ कपाशी अजीज शाह (वय 26 रा. पत्रेवाली मशीदजवळ, अंबिका नगर) या दोघांना अटक (Arrested) केली आहे. पुढील तपास एपीआय संदीप पाटील हे करीत आहेत. पोलिसांनी दोन जणांना या प्रकरणी अटक केली आहे. तर अन्य दोघांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com