खुनातील आरोपीला शिर्डीतून अटक ; धुळे शहर पोलिसांची वेगवान कामगिरी

पाच हजारांचे रिवार्ड जाहीर
खुनातील आरोपीला शिर्डीतून अटक ; धुळे शहर पोलिसांची वेगवान कामगिरी

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील साक्री रोडवरील जमनागिरी भिलाटीतील राहत्या घरात महिलेचा खून करणार्‍या संशयीत आरोपीला शहर पोलिसांनी (police) 24 तासांच्या आतच बेड्या ठोकल्या. त्याला शिर्डीतून (Shirdi) ताब्यात घेण्यात आले. शहर पोलिसांच्या वेगवान कामगिरीचे पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी विशेष कौतूक केले. तसेच पथकाला 5 हजारांचे रिवार्ड जाहीर केले.

खुनातील आरोपीला शिर्डीतून अटक ; धुळे शहर पोलिसांची वेगवान कामगिरी
गावठी कट्टे घेवून जाणाऱ्या नाशिकच्या तरुणांना अटक

निता वसंत गांगुर्डे (वय 30) असे मयत महिलेचे नाव आहे. ती बादल रामप्रसाद सोहिते/नाहार (वय 40) याच्या सोबत लग्न करावयाचे म्हणुन मार्च 2020 पासुन घरातुन निघुन गेली होती. बादल सोहित व निता गांगुर्डे हे दोघे गोपाळनगर मागील जमनागिरी भिलाटीत 4 ते 5 महिन्यापासुन एकत्र राहत होते. बादल सोहिते हा निता हिच्या चारीत्र्यावर संशय घेवुन तिला मारहाण करीत असे. दि.14 जानेवारी रोजी रात्री साडेदहा ते दि.15 रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान बादल सोहिते याने निता हिस चारीत्र्याचे संशयावरुन चेहर्‍यास मारहाण करुन तिचा खुन करुन फरार झाला होता.

खुनातील आरोपीला शिर्डीतून अटक ; धुळे शहर पोलिसांची वेगवान कामगिरी
गावठी कट्टे घेवून जाणाऱ्या नाशिकच्या तरुणांना अटक

याबाबत मयत निताचा भाऊ सचिन वसंत गांगुर्डे (वय 28 रा.रमाबाई आंबेडकर नगर, गल्ली नं.9 देवपुर) याने दिलेल्या फिर्यादीवरुन बादल सोहिते याच्याविरोधात काल सायंकाळी धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेत धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, पोना कुंदन पटाईत, पोकॉ निलेश पोतदार, पोकॉ मनिष सोनगीरे यांनी गुन्हयातील फरार आरोपीताला शिर्डी येथुन ताब्यात घेतले. गुन्हयाचा तपास सपोनि दादासाहेब पाटील हे करीत असुन गुन्हयाच्या कामकाजात पोहेकॉ मच्छिद्र पाटील, विजय शिरसाठ, पोकॉ अविनाश कराड, प्रविण पाटील, तुषार मोरे, शाकीर शेख, गुणवंत पाटील, प्रसाद वाघ, महेश मोरे, गौरव देवरे हे सहकार्य करीत आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सहा.पोलीस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

खुनातील आरोपीला शिर्डीतून अटक ; धुळे शहर पोलिसांची वेगवान कामगिरी
गावठी कट्टे घेवून जाणाऱ्या नाशिकच्या तरुणांना अटक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com