मूलभूत सुविधा पुरविण्यास महापालिका असमर्थ

आ. फारूख शाह यांची प्रधान सचिव व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, आज नगरविकास विभागात बैठक
धुळे महापालिका
धुळे महापालिका

धुळे dhule। प्रतिनिधी

शहर वासियांना मुलभूत सुविधा (provide basic facilities) पुरविण्यास महापालिका (Municipalities) असमर्थ (unable) ठरली असून शहरवासियांना पाणी,स्वच्छता,रस्ते व अशा मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे अशी तक्रार आ.फारुख शाह यांनी प्रधान सचिव व मुख्यमंत्री यांच्याकडे केली. त्याची दखल घेवून नगरविकास विभागाच्या (Department of Urban Development) प्रधान सचिव यांच्याकडे दि.21 रोजी दुपारी 2.30 वाजता महापालिकेचे आयुक्त व अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येणार आहे.

यासंदर्भात आ.शाह यांनी बारा मुद्यांवर प्रधान सचिव यांना पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, महापालिका जनतेला नागरी सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरली आहे. नागरीक विविध कर भरतात. मात्र कुठल्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुबलक पाण्याचा साठा असून देखील मनपा मार्फत आठ ते दहा दिवसात नागरीकांना अनियमित व अशुद्ध पाणी पुरविले जाते. पुरेसे कचरा संकलन होत नसल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत. नियमित घंटागाडी येत नसल्याने नागरीक रस्ता आणि गटारीत कचरा फेकतात. अपुर्‍या स्वच्छता कामगारांअभावी धुळेकर जनतेच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झालेला आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेले दिसतात.

त्यामुळे वाहतुकीची समस्या बिकट झालेली आहे. जनावरांना वाहने धडकल्यामुळे अनेक नागरीक जखमी देखील झालेले आहेत. यासंदर्भात तक्रारी करून देखील मनपा प्रशासनाने कुठलीच उपाययोजना केलेली नाही. शहरात गल्लोगल्ली मोकाट कुत्र्यांची संख्या इतकी वाढलेली आहे. शहरात नागरिकांपेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त आहेे. रात्रीच्या वेळी रस्त्याने चालणे देखील मोकाट कुत्र्यांमुळे अशक्य होते. मात्र महापालिका प्रशासनाने अद्यापपावेतो कुठलीच कारवाई केलेली नाही.

शहरातील मुख्य रस्ते व चौक व्यावसायिक व रहिवासी अतिक्रमणाने वेढलेले आहेत. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे. तसेच शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेले दिसतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या बिकट झालेली आहे.

शहरातील महापालिकेतील हॉस्पिटलमध्ये औषधांच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून आज सुद्धा महापालिकेच्या दवाखान्यामध्ये औषधे उपलब्ध नाही. तसेच अनेक भागात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. मनपाचा आरोग्य विभाग कुचकामी असल्यामुळे गटारी,नाले यांची स्वछता वेळोवेळी केली जात नाही. परिणामी मलेरियाचा प्रादुर्भाव दिसून येतो. वेळोवेळी फवारणी करणे आवश्यक असताना व त्या संदर्भात तक्रारी करून देखील फवारणी केली जात नाही.

शहरातील नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. याबाबतीत तक्रार करून देखील नाल्यावरील अतिक्रमणे महापालिकेतर्फे काढली जात नाही. तसेच शहरातील नाले माती व कचर्‍याने तुडुंब भरलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करणे, गाळ काढणे अपेक्षित असताना याकडे महापालिका प्रशासन हेतुपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

इतर महापालिकाच्या तुलनेने महापालिकेची कर आकारणी जास्त आहे. तरीही नागरिक महापालिकेला कर अदा करीत असतात. मात्र महापालिका कराची पठाणी वसुली करते. आधी सुविधा दिल्या पाहिजे मग कर वसुली केली पाहिजे.

महापालिकेच्या मालकीचे अनेक भुखंड व खुल्या जागा भूमाफियांनी बळकावल्या आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.

शहरातील महापालिका शाळांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली असून सुद्धा शाळा दुरुस्तीसाठी महापालिकेमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येत नाही. शाळांना बंद करून तेथे मोठ्या प्रमाणावर व्यापारी संकुल बांधण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.

वरील बारा मुद्यांच्या अनुषंगाने प्रधान सचिव यांच्याकडे दि.21 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता अप्पर मुख्य सचिव नगरविकास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com