भाजपाच्या काळात महापालिकेची तिजोरी रिकामी

स्थायी समितीच्या सभेत कमलेश देवरे व अमीन पटेल यांचा आरोप
भाजपाच्या काळात महापालिकेची तिजोरी रिकामी

धुळे Dhule । प्रतिनिधी

भाजपाची BJP सत्ता आल्यानंतर गेल्या अडीच वर्षात महापालिकेची Municipal Corporation तिजोरी treasury खाली empty झाली आहे. ठेकेदारांची बिले काढली जात नाहीत. त्यामुळे ठेकेदारांनी कामे थांबविली आहेत. पथदिव्यांचे कामे बंद असून कचरा ठेका रखडला आहे. भूमिगत गटारींचा ठेकेदारही पळून गेला आहे. याला सत्ताधारी जबाबदार आहेत. असा आरोप Allegations विरोधी पक्षनेते कमलेश देवरे Leader of the Opposition Kamlesh Deore आणि अमीन पटेल यांनी केला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगर सचिव मनोज वाघ, कमलेश देवरे, सुनिल बैसाणे, अमोल मासुळे, अमीन पटेल, नागसेन बोरसे, हिना अन्सारी, भारती माळी आदी उपस्थित होते.

बिलांअभावी सर्व ठेकेदारांचे कामे थांबली आहेत. प्रभागातील समस्या मांडूनही त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. कचरा संकलनाचा प्रश्न रखडला आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनावर सत्ताधार्‍यांचा वचक राहिलेला नाही. जनता आम्हाला जाब विचारते. त्यांना काय उत्तरे द्यावीत. महापालिका आहेत की, ग्रामपंचायत असा प्रश्न निर्माण होत आहे. असा आरोप अमीन पटेल यांनी केला.

भाजपाचे 50 नगरसेवक महापालिकेत निवडून आले आहेत. परंतू त्यांचा प्रशासनावर वचक नाही. शहरातील रस्ते, खड्डे, पाणी हे मुलभूत प्रश्न देखील सुटलेले नाहीत. शहरात कचर्‍याचा प्रश्न गंभीर आहे. समस्या सोडविल्या जात नाहीत त्यामुळे नगरसेवक बदनाम होतात. ठेकेदारांशी अधिकार्‍यांचे लागेबांधे आहेत. अशा अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी कमलेश देवरे यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com