महापालिकेतर्फे मशाल रॅलीचे आयोजन

महापालिकेतर्फे मशाल रॅलीचे आयोजन
dhule municipal corporation

धुळे Dhule । प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष (75 years of Indian Independence) पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती (Memory of freedom struggle) तेवत रहाव्या तसेच भारताची फाळणी ही एक शोकांतिका असून शासन आदेशानुसार 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीशिका स्मृती दिवसानिमित्त (Partition Vibhishika Memorial Day) महापालिकेतर्फे (Municipal Corporation) फाळणीचे दुःख यावर आधारीत अनोखा उपक्रम आयोजित केलेला आहे.

राष्ट्राच्या फाळणीमुळे प्राण गमावलेल्या व मूळापासून विस्थापित झालेल्या सर्वाना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस त्यांच्या बलिदानाचे स्मरणदिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या बलिदान दिनामुळे भारतीयांच्या वर्तमान आणि भावी पिढयांना या काळात लोकांना भोगाव्या लागणार्‍या वेदना आणि वेदनाची आठवण होईल म्हणून महापालिकेतर्फे दि.

14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मनोहर टॉकीज ते जमनालाल बजाज मार्गापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीच्या समारोपानंतर जमनालाल बजाज मार्ग येथे भारताच्या फाळणीवर आधारीत फाळणीचे दु:ख हा लघुपट दृश्यस्वरुपात मोठ्या पडदयावर प्रक्षेपित केला जाणार आहे.

या मशाल रॅलीत नागरीकांनी उत्सुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com