मनपा स्थायी समितीच्या सभेत खडाजंगी

मनपा स्थायी समितीच्या सभेत खडाजंगी

धुळे/प्रतिनिधी- Dhule

महापालिकेच्या (Municipal Corporation) स्थायी समिती सभा (Standing Committee Meeting) आज चांगलीच गाजली. फेरनिविदेच्या (Tender again) मुद्द्यावरून सभापती शितल नवले आणि सदस्य नागसेन बाेरसे यांच्यात शाब्दिक वाद (Verbal argument) निर्माण झाल्याने सभागृहातील वातावरण तापले. प्रसंगी दोघांनी एकमेकांना आवाज खाली (Khadajangi) करण्याच्या सूचना दिल्या.

गेल्या सभेत तहकूब केलेल्या विषयासंदर्भात फेरनिविदा (Tender again) काढण्याचा ठराव करण्यात आल्याचा आराेप स्थायी समितीच्या (Standing Committee Meeting) सभेत नागसेन बाेरसे यांनी केला. तर आपण विषय तहकूब केला असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. मात्र आपल्याकडे फेरनिविदा काढण‌्याचा ठराव असल्याचे सांगत त्यांनी सभापतीवर गंभीर आराेप केले. याप्रसंगी नालेसफाई निविदा, पाणीपुरवठा, सदस्यांकडून मांडण्यात येणाऱ्या विषयावर काेणतीही कारवाई हाेत नसल्याबद्दल सभेत सत्ताधारी सदस्यांनी नाराजी (Disgruntled members in power) व्यक्त केली.

महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात स्थायी समितीची सभा सभापती शितल नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात झाली.

यावेळी सहाय्यक आयुक्त शिल्पा नाईक, नगरसचिव मनाेज वाघ, सदस्य हर्ष रेलन, संजय जाधव,प्रतिभा चाैधरी, साबीर शेख, भादिमा अन्सारी, किरण अहिरराव, बन्सी जाधव अादींसह संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.

सभेच्या सुरूवातीला संजय जाधव यांनी हद्दवाढीच्या गावातील भुखंडाबाबत आपण तक्रार (Complaint regarding plot) केली असतांना त्यासंदर्भात प्रशासनाकडून काेणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात वलवाडीचा कारकून श्याम चाैधरी यांनी संपूर्ण रजिष्टरमध्ये खाडाखाेड केली असतांना त्यांच्यावर कारवाई तर साेडा साधी त्याला नाेटीसही देण्याची तसदी घेतली नाही. अनेक भुखंडाचे विक्री झाली आहे. यासंदर्भात प्रशासनाने पंधरा दिवसात कारवाई न केल्यास आपण स्वत: पाेलिसात तक्रार करू असा इशारही त्यांनी दिला

याप्रसंगी सभेला अायुक्तांना उपस्थित राहणे सक्तीचे करावे, अशीही मागणी केली. याप्रसंगी सभेच्या विषयपत्रिकेवरील शेवटच्या विषय कार्डियाक रूग्णवाहिका खरेदीसाठी मागविलेल्या निविदेच्या दरबाबत चर्चेचा विषय हाेता. त्यावर बाेलतांना नागसेन बाेरसे यांनी सांगितले की, मागील सभेत हा विषय तहकूब ठेवण्यात अाला हाेता. तसेच वृत्तही छापून अाले हाेते. तरीही फेरनिविदेबाबतचा ठराव करण्यात अाला असून ताे अापल्याकडे असल्याचा अाराेप केला. याप्रसंगी त्यांच्यावर पालकमंत्र्याकडून दबाव अल्याचाही अराेप केला.

याप्रसंगी सभापतींकडूनही त्यांना वारंवार तुमचे बाेलणे झाले का अशी विचारणा केली जात हाेती. त्यावेळी सभापती व सदस्य बाेरसे दाेघांंचेही अवाजाचा सूर वाढला हाेता. त्यातून एकमेकांना त्यांनी खालील अवाजात बाेलावे अशा शब्दात त्यांनी एकमेकांना सांगितल्याने सभागृहातील वातावरण गंभीर झाले.

मात्र अापण तहकूबच केल्याचा ठराव केला अाहे.तुमच्याकडे काेणते कागदपत्र अाहेत. ते मला माहित नाही असेही सभापतींनी स्पष्ट केले.अखेर या विषयाला मंजुरी दिली गेली. इतरही सर्वच विषय सभात मंजुर करण्यात अाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com