मोटारसायकलींची समोरासमोर धडक, दोन ठार

मोटार सायकल जळाली, खड्डे टाळण्याच्या नादात अपघात, चार जण जखमी
मोटारसायकलींची समोरासमोर धडक, दोन ठार

बोराडीBoradi । वार्ताहर

वाघाडी रस्त्यावरील नांदेड नर्सरी जवळ खड्डे (Pits) टाळण्याच्या नादात दोन मोटरसायकली(Motorcycles) समोरासमोर धडकल्या (collided head-on) यात दोन जण ठार (killing two) झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघात इतका जबरदस्त होता की अपघातानंतर एका मोटरसायकलने पेट घेतला.

राकेश शांतीलाल सैंदाणे (वय 22)े रा. बोराडी व कैलास माधू पावरा (वय 26) रा. मांजरबड्डी-वाकपाडा असे मयतांचे नाव आहे.

बोराडी येथील राकेश शांतीलाल सैंदाणे (वय 22), अमोल दीपक जगदेव (वय 25), रवींद्र सुभाष बेडसे (वय 22) हे तिघे मित्र शिरपूर येथे अमोल जगदेव यास पुण्याच्या ट्रॅव्हलमध्ये (Travel) बसवण्यासाठी जात होते. तर माजरबडी-वाकपाडा येथील कैलास माधू पावरा (वय 26) पिंट्या सूनील पावरा (वय 19) डेबा आमस्या पावरा (वय 20) हे तिघे जण शिरपूर येथे सेंट्रींग कामासाठी (Centering work) गेले होते.

संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास येणार्‍या दोन्ही मोटरसायकली नादर्डे नर्सरी जवळ खड्डे(Pits) टाळण्याच्या नादात समोरासमोर धडकले. धडक एवढी मोठी होते. दोन्ही मोटरसायकल काही अंतरापर्यंत घसरत गेल्याने त्यातील एक मोटर सायकलने पेट घेतला. अपघाताचा (Accident) आवाज झाल्यावर जवळपास असेल शेतातील नागरिक घटनास्थळी धावून आले. घटना पाहून त्यांच्या ते हादरले. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे (Zilla Parishad President Dr. Tushar Randhe) हे बोराडी येथे जात असताना त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना उपचारासाठी तात्काळ हलविले.

या अपघातात बोराडी येथील राकेश शांतीलाल सैंदाणे याचा शिरपूर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात (Indira Gandhi Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर व मांजरबडी -वाकपाडा येथील कैलास महादू पावरा हा जागीच ठार झाला. तर बोराडी येथील अमोल दीपक जगदेव याला पायाला जबर दुखापत (Injury) झाली असं शिरपूर येथील इंदिरा मेमोरियल येथे उपचार सुरू आहे. तर रवींद्र सुभाष बेडसे यांना डोक्याला जबर मार लागल्याने धुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.तसेच मांजरबडी -वाकपाडा येथील पिंट्या सुनील पावरा व डेबा आमास्या पावरा हे जबर जखमी (Injury) झाले आहेत.

नांदेड या नर्सरी जवळ रस्ता (road) मोठ्या प्रमाणात खराब (Bad) असल्याने खड्डे टाळण्याच्या नादात दोघे मोटरसायकल समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) दोन्ही मोटरसायकलींचा पुढील भाग चक्काचूर झाला असून धडक झाल्यानंतर बजाज प्लेटिना मोटर सायकलीला आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपसरपंच राहुल रंधे, निलेश महाज आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनेची माहिती मिळताच बोराडी व मांजरबडी- वाकपाडा येथे शोककळा पसरली होती. अपघातात ठार झालेला युवकांच्या खरी नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. राकेश सैंदाणे हा घरातील कर्ता मुलगा असल्याने तो गावात व परिसरात घर पेंटिंगचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. त्याचा स्वभाव मनमिळाऊ असल्या कारणाने त्याने मोठा गोतावळा व मित्रपरिवार निर्माण केला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. तर मांजरबडी-वाकपाडा येथील कैलास महादू पावरा हा शिरपूर येथे सेंट्रींग काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या लग्नाला दीड वर्ष झाली होती. त्याच्या पश्चात मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

बोराडी ते वाडी रस्ता मृत्यूचा सापळा-बोराडी ते वाडी रस्त्या दरम्यान रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याने अपघात ((Accident)) दररोज होत आहेत. यात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. तर अनेकांचे अपंगत्व आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com