दुचाकी खड्डयात पडून सासू ठार, जावई जखमी

दुचाकी खड्डयात पडून सासू ठार, जावई जखमी

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

तालुक्यातील आर्वी गावानजीक खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात दुचाकी खड्डात पडून सासु ठार झाली. तर जावाई जखमी झाला आहे. काल दुपारी हा अपघात झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधुबाई भिकनराव बाविस्कर (वय 65 रा. थाळनेर ता. शिरपूर) असे मयत महिलेचे नाव आहे. तर विश्वनाथ जिजाबराव निकम (वय 45 रा. महाडपुर ता. शिंदखेडा ह.मु श्री एकविरा देवी मंदिराजवळ, देवपूर, धुळे) हे जखमी आहेत. ते त्यांच्या दुचाकीने (क्र.एमएच 18 बीटी 7690) काल दि. 15 रोजी दुपारी सासु सिंधुबाई भिकनराव बाविस्कर (वय 65 रा. थाळनेर ता. शिरपूर) यांना दुचाकीवर मागे बसवून झोडगे येथून धुळ्याकडे येत होते.

त्यादरम्यान ते आर्वी गावासमोरील पुलावरील खड्डे टाळून दुचाकी चालवित असतांना अचानक दुचाकी खड्डयात पडली. त्यात दोघे खाली पडले. विश्वनाथ यांना दुखापत झाली. तर सिधुंबाई यांच्या हाताला व पायाला खरचटले गेले. मात्र त्याचवेळी मागून मालेगावकडून धुळ्याकडे खड्डे टाळत येणार्‍या ट्रकचे चाक सिंधुबाई यांच्या डाव्या हातावरून गेले.

दोघांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा सिंधुबाई यांना डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. हा अपघात महामार्गावरील खड्डयामुळे झाल्या असल्याची तक्रार गुणवंतराव गंभीरराव सोनवणे (रा. हातेउ खुर्द ता. चोपडा) यांनी तालुका पोलिसात दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com