धुमस्टाईलने मोबाईल हिसकावणार्‍या मालेगावच्या सराईत चोरट्यांना अटक

२० मोबाईल हस्तगत, चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई
धुमस्टाईलने मोबाईल हिसकावणार्‍या मालेगावच्या सराईत चोरट्यांना अटक

धुळे - dhule

शहरात धुमस्टाईलने (Mobile) मोबाईल हिसकविणार्‍या (Malegaon) मालेगावच्या दोघा (Thieves) चोरट्यांना (Chalisgaon) चाळीसगाव रोड (police) पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २० मोबाईलसह एका दुचाकी असा एकुण ३ लाख ७२ हजार ७७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धुमस्टाईलने मोबाईल हिसकावणार्‍या मालेगावच्या सराईत चोरट्यांना अटक
किचन वेस्ट मधून मिळवले चारशे ग्रॅम आले

शहरातील (Agrawal Nagar) अग्रवाल नगरात राहणारे व्यावसायीक गुरमितसिंग बदान हे दि. २० एप्रिल रोजी घराजवळ (Mornic Walk) मॉर्निक वॉक करीत होते. त्यादरम्यान ते मोबाईलवर बोलत असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचा ४५ हजारांचा मोबाईल हिसकावून नेला.

याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा गुन्हा फरीद अहमद मोहंमद हुसेन (वय २, रा. चंदनपुरी गेट, भायकळा झोपडपट्टी, मालेगाव) व मोहंमद आदिल मोहंमद जमाल (वय २५, रा. हिरापुरा झांजल देवळाजवळ, मालेगाव) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक पवार यांच्यासह शोध पथकाने त्यांना मालेगाव येथून ताब्यात घेतले.

धुमस्टाईलने मोबाईल हिसकावणार्‍या मालेगावच्या सराईत चोरट्यांना अटक
राज सभा ; मनसैनिकांचा उत्साह शिगेला!

पोलिसांनी दोन्ही संशयितांसह ज्याला मोबाईल विकला त्या अरबाज मोहंमद हुसेला यास देखील ताब्यात घेत त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे एकुण २० मोबाईल व गुन्ह्यात वापलेली दुचाकी जप्त केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

धुमस्टाईलने मोबाईल हिसकावणार्‍या मालेगावच्या सराईत चोरट्यांना अटक
आयपीएलमध्ये आज डबल धमाका; 'हे' संघ आमनेसामने

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार, हवालदार पंकज चव्हाण, कैलास वाघ, पोना भुरा पाटील, संदीप कढरे, अविनाश पाटील, पोकॉ. स्वप्नील सोनवणे, चेतन झोलेकर, इंद्रजित वैराट, हेमंत पवार, प्रशांत पाटील, शरद जाधव, सोमनाथ चौरे यांच्या पथकाने केली.

दरम्यान गुन्ह्यातील संशयीत आरोपी मोहम्मद अजमल याच्यावर ओझर, आझादनगर, पवारवाडी (मालेगाव), मालेगाव शहर पोलिसात तर अरबाज अन्सारी यांच्यावर देखील भद्रकाली (नाशिक) पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.