मनसेचेे रस्त्यातील साचलेल्या डबक्यात आंदोलन

मनसेचेे रस्त्यातील साचलेल्या डबक्यात आंदोलन

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील देवपूर परिसरात (Devpur area) रस्त्यांची दुरावस्था झालेली (Bad condition of roads) असून वलवाडी व आधारनगर परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण गेल्या अनेक महिन्यांपासून उखडलेले आहे. त्यातच रस्त्यांवर मोठ-मोठी खड्डे (Big pits) पडलेले आहेत व अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Sena) आज रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये (standing water on the road) उभे राहून महापालिकेचा निषेध (Municipal protest) करून लवकरात लवकर रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी आंदोलन करण्यात आले.

रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून कॉलनी परिसरातील लोकांना दिवस-रात्र ये जा करावी लागते. तसेच जीव धोक्यात घालून वाहन चालवावी लागतात. अनेक वेळा अपघात होतात. वयोवृद्ध व शाळकरी मुलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते आहे. रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झालेली आहे या परिसरात रस्त्यांना मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.

परंतु कॉलनी परिसरात प्रचंड पाणी साठल्यामुळे येथे डास व रोगराईच्या प्रादुर्भाव वाढत चालला आहे आणि या सर्व परिस्थितीस फक्त महापालिका प्रशासन जबाबदार आहे. कुठल्याही प्रकारची उपाययोजना रस्त्यांच्या बाबतीत होताना दिसत नाही. नागरिकांना प्रचंड शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये उभे राहून महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत यांनी महापालिका प्रशासनाने लवकरच या विभागातील रस्त्यांची कामे मार्गी न लावल्यास महापालिकेस टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिला.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, धुळे तालुकाध्यक्ष संतोष मिस्तरी, शहर सचिव हरीश जगताप, विभाग अध्यक्ष सतीश पाटील, शामक दादाभाई, अविनाश देवरे, योगेश सैंदाणे, विवेक बिडकर, आदर्श पोलादे,स्वप्नील पाटील, शाखा अध्यक्ष कुणाल पाटील, शाखा उपाध्यक्ष अक्षय बोरसे, शाखा उपाध्यक्ष शाम सोगत, शाखा सचिव कल्पेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com