मनसेने आयुक्तांच्या दालनाला बांधली धुळेकरांच्या समस्यांची हंडी

तीव्र आंदोलनाचा इशारा
मनसेने आयुक्तांच्या दालनाला बांधली
 धुळेकरांच्या समस्यांची हंडी

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासुन विविध समस्यांमुळे त्रस्त (suffering from various problems) झाले आहेत. वांरवांर तक्रारी करून, निवेदने देवूनही सत्ताधार्‍यांसह अधिकार्‍यांकडून (authorities including rulers) कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्तांच्या (Municipal commissioner) दालनाला समस्यांची (problems) हंडी बांधली (Handi was built). त्यानंतर प्रशासनाला ही हंडी भेट दिली. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

याप्रंसगी मनसेचे धुळे महानगराध्यक्ष संजय सोनवणे, वाल्मीक जाधव, रविराज जोशी, सुनिल बावीस्कर, भुषण वाडीकर, गणेश सोनवणे, उन्मेश शिंपी, सागर दहिहांडे, निलेश नंदन, राहुल मराठे, राहुल वाघ, दिनेश चौधरी, गणेश जाधव, विक्की सोनार आदी उपस्थित होते. याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात स्वच्छता, रस्ते, अवेळी पाणी पुरवठा व दूषित पाणी पुरवठा, उघड्यावर साचलेली घाण, मोकाट जनावरे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ, वाढीव घरपट्टी यासह आता डेंग्यु, मलेरीया सारखे आजारही डोके वर काढत आहेत. कामचुकार अधिकारी, कर्मचारी व सत्ताधारी, लोकप्रतिनीधींच्या हलगर्जी पणामुळे मुलभुत समस्यांचे निराकारण होवु शकत नाही. त्यामुळे जनता वैतागली आहे.

कायदा व सुव्यवस्थेला बाधा उत्पन्न होवु शकते. म्हणुन वेळीच या सर्व प्रकारावर आयुक्तांनी कार्यवाही करून जनतेला या त्रासातुन मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.

प्रसंगी अशा धुळेकर नागरीकांच्या समस्यांची हंडी आयुक्तांना देण्यात आली. या समस्यांची हंडी आपल्या हातुन फोडुन धुळेकर जनतेला या त्रासातुन मुक्त करावे, असेही निवेदनात म्हटले आहे. या सर्व समस्यांवर वेळीच तोडगा न काढल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे महानगरातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com