भोंगा जप्त ; धुळ्यात मनसे जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्याना अटक

भोंगा जप्त ; धुळ्यात मनसे जिल्हाध्यक्षासह  पदाधिकाऱ्याना अटक

धुळे - प्रतिनिधी dhule

(mns) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संभाजीनगर (Sambhajinagar) येथील जाहिर सभेत आज दि.4 मे रोजी मशिदी समोर दुप्पट आवाजाने भोंगा लावून हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख (Add. Dushyant Raje Deshmukh) यांच्यासह पदाधिकारी आज सकाळी शिवतीर्थ येथे जमले असता त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करत शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

भोंगा जप्त ; धुळ्यात मनसे जिल्हाध्यक्षासह  पदाधिकाऱ्याना अटक
भेंडवळ घटमांडणीचे भाकीत ; पाऊस पाणी मुबलक, राजा कायम राहणार, रोगराईचे प्रमाण नियंत्रणात!

यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस संदीप जडे, मनसे धुळे तालुकाध्यक्ष संतोष मिस्त्री, मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष संध्या पाटील, उपजिल्हाध्यक्ष स्वाती जाधव, शहर उपाध्यक्ष प्रशांत तनेजा, राजेश दुसाने, विभाग अध्यक्ष योगेश वाणी, हरीश जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी अटक केली.

यावेळी त्यांच्या सोबत हनुमान चालीसा वाजवण्यासाठी सोबत घेतलेला भोंगा देखील जप्त करण्यात आला आहे. प्रसंगी मनसे पदाधिकाऱ्यांनी जय श्रीराम, जय हनुमान अशा जोरदार घोषणा दिल्या. आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत सदर अटक ही हिंदूंचा आवाज दाबला जावा यासाठी असली तरी आम्ही हे सहन करणार नाही. अशा घोषणाही देण्यात येत होत्या.

Related Stories

No stories found.