आ. कुणाल पाटील यांनी विरोधकांना दिला सल्ला.. म्हणाले वर्चस्वाच्या पोकळ वल्गना करु नका

आ. कुणाल पाटील यांनी विरोधकांना दिला सल्ला.. म्हणाले वर्चस्वाच्या पोकळ वल्गना करु नका

धुळे Dhule । प्रतिनिधी

तालुक्यात बिनविरोध आणि निवडणूक झालेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांवर (Various Executive Service Societies) काँग्रेसचेच (Congress) वर्चस्व आहे. सोसायटीमध्ये काही जागांच्या स्वार्थासाठी विरोधकांनी निवडणूका (Elections) लादल्या. मात्र तेथेही त्यांना पराभव स्विकारावा लागला. तालुक्यातील जनता नेहमीच विकासाच्या पाठीमागे राहिली आहे. त्यामुळे जनतेच्या खंबीर साथीने आम्ही तालुक्यातील व जिल्हयातील कोणत्याही निवडणूकीसाठी सज्ज असून विरोधकांनी (Opponents) पोकळ वल्गना (hollow vulgarities) करु नये, असे थेट आव्हान काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा आ.कुणाल पाटील (MLA. Kunal Patil) यांनी एका सत्कार समारंभात दिले.

धुळे तालुक्यातील बोरविहीर गटातील गावांमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये निवडून तसेच बिनविरोध झालेल्या पदाधिकार्‍यांचा रानमळा (ता.धुळे) येथे सायंकाळी सत्कार समारंभ (Hospitality Ceremony) पार पडला. आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, कार्यकर्ता, पदाधिकार्‍यांचा योग्यवेळी सन्मान व सत्कार झाला पाहिजे. त्यामुळे त्यांना एक नवीन उर्जा मिळत असते. गावागावातील विविध निवडणूका बिनविरोध (Elections unopposed) झाल्या तर वाद निर्माण होत नाही. एकमेकातील हेवेदावे, व्देष बाजूला ठेवून गावाच्या एकात्मतेसाठी व विकासासाठी निवडणूका बिनविरोध झाल्या पाहिजे. विरोधकांना गावागावात निवडणूका लावून आपल्याही काही जागा निवडून येतील, अशी अपेक्षा होती. मात्र तेथेही त्यांना पराभव स्विकारावा लागला.धुळे तालुक्यात काँग्रेसचेच (Congress) वर्चस्व असून जनता विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. आज आपण प्रत्येक गावात आपण वैयक्तीक कामांबरोबरच विकासाच्या कामे करीत आहोत. तालुक्यातील प्रत्येक गावा माझे असून मी त्या गावाचा आहेफ त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकरी, गोरगरीब सर्व सामान्य जनतेची सुखदुखे वाटून घेत विकास करण्याची जबाबदारीही माझी आहे.

त्यामुळे विरोधकांनी जनतेची दिशाभूल न करता खोट्या वल्गना करु नये. जनतेच्या खंबीर साथीमुळे तालुक्यात व जिल्हयात होणार्‍या प्रत्येक निवडणूकीसाठी काँग्रेस पक्ष सक्षम असल्याचा विश्वास आ.कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात प्रारंभी बोरविहीर जि.प.सदस्य अरुण पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर संभाजी राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कार समारंभात बोरविहीर गटात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक गावातील सोसायट्यांचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते विनायक शिंदे, जिल्हा काँग्रेसचे सचिव डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी पं.स.सभापती बाजीराव पाटील, माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार, कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव पाटील, मुख्य प्रशासक रितेश पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष कें.डी.पाटील, माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, माजी पं.स.सदस्य योगेश पाटील, माजी जि.प.सदस्य संभाजी गवळी, माजी जि.प.सदस्य विशाल सैंदाणे, खरेदी विक्रीचे व्हा.चेअरमन दिनकर पाटील, नगरसेवक दगडू बागुल, भगवान देवरे, विठ्ठल गावडे, जि.प.सदस्य अरुण पाटील, सुनिल कदमबांडे, युवक काँग्रेसचे राजीव पाटील, उपसरपंच कुणाल पाटील, संचालक बापू खैरनार, बल्हाणे सरपंच आनंदा पाटील, रानमळा सेवा सोसायटी चेअरमन किसन पानगे, व्हा.चेअरमन संतोष धुमाळ, पंडीत क्षिरसागर, रमेश गावडे, तुकाराम गावडे, हनुमंत गावडे, परमेश्वर खर्चे, पंकज सोमवंशी, गोपाल पानगे, प्रमोद गावडे, पंडीत मोरे, विजय धुमाळ, मनोज उचाळे, कैलास मोरे, विजय रामजी अहिरे, अमोल उचाळे, भगवान देवरे, फागणे सरपंच कैलास पाटील, दगडू बागुल, हर्षल साळुंके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जि.प.सदस्य अरुण पाटील आणि रानमळा येथील ग्रामस्थांनी केले होते. सूत्रसंचालन डी.एल.पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com