
धुळे Dhule । प्रतिनिधी
अचलपूरचे आ.बच्चू कडू (MLA Bachu Kadu)यांनी टीका (While criticizing) करताना अवमानकारक वक्तव्य (defamatory statement) केल्याने आज तृतीयपंथी (transgender) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector's office) आवारात निषेध आंदोलन (Protest movement in premises) केले. यावेळी बच्चू कडूंच्या प्रतिमेला तृतीयपंथीयांनी जोड्यांचा मार दिला. तसेच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बहुजन आघाडीच्या मार्गदर्शनात हे आंदोलन झाले. एका वृत्तवाहिनीवर बोलताना आ. बच्चू कडू म्हणाले होते की, रवी राणा तुम्ही माझ्यावरील करत असलेल्या आरोपात, एक पुरावा सिद्ध करुन दाखवला तर त्यांचे घरी भांडी घासू, असे सांगतांनाच तृतीयपंथीय समुदायाच्या भावना दुखवतील असे वक्तव्य केले. विशेष म्हणजे आ.कडू हे स्वत: तृतीयपंथी हक्क व कल्याण संरक्षण मंडळाचे मानद सदस्य आहेत. असे असतानाही त्यांनी असे वक्तव्य करणे निंदनीय आहे. त्यांचेवर तृतीयपंथी हक्क तसेच आयपीसी 499, सामाजिक बहिष्कार आणि त्यापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम 2016 ओ. कलम 3 (13) नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
या आंदोलनात तृतीयपंथी यांच्या हक्कासाठी लढणार्या श्रीमती शमिभा पाटील, निलू पार्वती जोगी, स्वरा पार्वती जोगी, निलीमा जोगी, किरण जोगी, रुकसार जोगी, शुभांगी जोगी, साक्षी जोगी, राधा जोगी, अक्षरा जोगी, दुर्गा जोगी, कोमल जोगी, अश्विनी जोगी, जान्हवी जोगी, विशाखा जोगी, रुपाली जोगी, अंकीता जोगी, सिमरन जोगी, रोशनी कुंवर, हिना कुंवर, रईस कुंवर, गौरी पवार, किंजल पाटील, अलका जोगी, रेणुका जोगी आदी सहभागी झाले होते.