
कापडणे Kapaḍaṇe । प्रतिनिधी
खान्देश सुकन्या डॉ.उर्वशी पाटील (Dr. Urvashi Patil) यांचा नुकताच मिस ग्लॅमरस (Miss Glamorous) या किताबाने गौरव (pride) करण्यात आला. तीन राज्यस्तरीय सौंदर्यवती (Beauty) स्पर्थेत त्या उपविजेत्या (Runner-up) ठरल्या. महाराष्ट्र, गुजरात व गोवा येथील सौदर्यवर्तीनी यात सहभाग नोंदविला. पुणे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला.
डॉ.उर्वशी पाटील या एम.डी. आयुर्वेद असून त्या नाशिक येथे प्रॅक्टीस करतात. व्यवसाय सांभाळून त्यांनी नियमीत योगासने, प्राणायम करत हे दिव्य यश संपादीत केले.
या स्पर्थेला सिने अभिनेत्री अंजना सुखानी, अभिनेता अमन वर्मा, गृहलक्ष्मी मैगजीनच्या संचालिका वंदना वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक येथील डॉ. संदीप पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. तसेच धुळे नंदूरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा.टी.पी.शिंदे व साधना शिंदे यांच्या कन्या तर पितांबर नानाभाऊ पाटील व शकुंतला पाटील यांच्या सून आहेत.
या यशाबदल डॉ. उर्वशी पाटील यांचे आ.अमरीशभाई पटेल, खा. डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री रोहिदास पाटील, आ. कुणाल पाटील, प्रभाकर चव्हाण, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, माजी आ. प्रा.शरद पाटील, शिरूड येथील कालीका माता संस्थेचे चेअरमन गजानन पाटील, माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे, अनिकेत पाटील, विजय पाटील, जि.प.सदस्य राम भदाणे, कुसुंबा एज्युकेशन संस्थेचे अविनाश शिंदे, डॉ. माधुरी बाफना, डॉ.अभय बोरसे, माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, प्रा.भरत पाटील, दिलीप पाटील, बापू पाटील, प्रा.एम.वाय. सुर्यवंशी, पी.पी.पाटील, प्रा.डॉ.उमेश गांगुर्डे, अमोल पाटील, प्रा.रवींद्र पाटील, संजय साळुखे, अमृत पाटील, ज्योती पाटील, प्रताप पाटील, प्रफुल्ल शिंदे, प्रा.प्रशांत साळुंखे, अनिल पाटील, दिनेश पाटील आदिंनी कौतूक केले आहे.