पांझरा किनार्‍यावरील मिनी गॅस पंपावर छापा, दोघे ताब्यात

पांझरा किनार्‍यावरील मिनी गॅस पंपावर छापा, दोघे ताब्यात

धुळे | dhule| प्रतिनिधी

नवनियुक्त सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (Sub Divisional Police Officer) एस.ऋषिकेश रेड्डी यांनी अवैध व्यवसायांविरोधात (Against illegal businesses) कारवाईचा धडाका (burst of action)सुरू केला आहे. आज सायंकाळी गवळीवाडा पांझरा नदी (Panjra river) किनारी सुरू असलेल्या अवैध मिनी गॅसपंपावर (illegal mini gas pumps) छापा (raided) टाकला.  तेथून कारसह 10 सिलेंडर असा 5 लाखांचा मुद्येमाल जप्त केला. तसेच दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पांझरा किनार्‍यावरील मिनी गॅस पंपावर छापा, दोघे ताब्यात
विद्यापीठात संशोधनातील नाविनत्येचा अविष्कार

याबाबत रात्रीउशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पांझरा नदी किनारील गवळीवाडा येथे पत्र्याच्या शेड जवळ काही जण घरगुती वापरायचे एलपीजी गॅस सिलेंडरमधुन मोटार द्वारे वाहनात गॅस भरत असल्याची गुप्त माहिती एस.ऋषिकेश रेड्डी यांना मिळाली.त्यानुसार त्यांनी पथकासह सायंकाळी सात वाजता तेथे छापा कारवाई केली.

तेथे एका ईको वाहनात (क्र.एमएच -१८-बीएक्स -२६९४) या वाहनामध्ये घरगुती वापरायचे गॅस सिलेंडर मधुन मोटार द्वारे धोकादायक रित्या वाहनात गॅस भरताना दोन जणांना रंगेहात पकडण्यात आले.

पांझरा किनार्‍यावरील मिनी गॅस पंपावर छापा, दोघे ताब्यात
विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे सोमवारी सुगम गायन स्पर्धा

त्यांच्या ताब्यातुन ५ लाख रुपये किमतीची कार, २० हजार रुपये किमतीचे  घरगुती वापरायचे १० गॅस सिलेंडर, 4 हजारांचे  दोन इलेक्ट्रीक वजन काटे व 15 हजार रुपये किमतीची गॅस भरण्याची मोटार व रेगुलेटर, नोझल, नळी असा एकुण 5 लाख ३९ हजार रुपये किमंतीचा मुद्दमाल जप्त करण्यात आला. मुद्देमालासह दोघं आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, शहर वाहतूक शाखेच्या सपोनि. संगिता राऊत, पोहेकॉ आरीफ शेख, पोहेकॉ भागवत पाटील, चालक देवेद्र काकडे,पोकॉ गुट्टे, सुनील कुलकर्णी तसेच उपविभागीय कार्यालयातील पोहेकॉ कबीर शेख, पोकॉ सुशिल शेंडे, रविंद्र पावरा, मोहन पवार यांच्या पथकाने केली आहे. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com