महासभेत लसीकरणावरुन सदस्य भिडले

स्थायीच्या आठ व महिला बालकल्याण समितीच्या 11 सदस्यांची निवड
महासभेत लसीकरणावरुन सदस्य भिडले

धुळे । Dhule प्रतिनिधी

स्थायी समिती (Standing Committee) व महिला बालकल्याण समिती (Women's Child Welfare Committee) सदस्य निवडीसाठी (Member selection) घेण्यात आलेल्या महासभेत (General Assembly) सत्ताधारी आणि विरोधक लसीकरणावरुन (Vaccination) एकमेकांवर भिडले. यामुळे सभागृहात वाद (Argument)झाला. ज्यांनी दोन डोस घेतले नसतील त्यांना सभागृहातून बाहेर काढा अशी भूमिका सत्ताधार्‍यांनी घेतली. तर विरोधकांनी अजेंड्यावर तुम्ही तसे लिहिले होते का? असा सवाल केला. यामुळे सत्ताधारी तोंडघशी पडले.

महापालिकेच्या सभागृहात विशेष महासभा महापौर प्रदीप कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर भगवान गवळी आदींसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी लसीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला. ज्यांनी दोन डोस घेतले असतील त्यांनीच सभागृहात बसावे, अन्यथा सभागृह चालू देणार नाही. अशी भूमिका हिरामण गवळी यांनी मांडली. त्यातून गोंधळाला सुरुवात झाली. विरोधकांनी तुम्ही अजेंड्यावर तसे लिहिले होते का? आम्हाला आदी सांगिलते असते तर आम्ही देखील दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत आणले असते. असे विरोधकांनी सांगितल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक महापौरांच्या आसनासमोर आले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आला.

सभागृहात गोंधळ निर्माण झाला. परंतू सत्ताधारी आणि विरोधकांमधील काही सदस्यांनी संयमाची भूूमिका घेवून यावर पडदा पाडला. महापौर प्रदीप कर्पे यांनी कोरोना नियमावलीचे प्रत्येकाने पालन करावे. यापुढे दोन डोस घेतले असतील तरच सभागृहात यावे, अन्यथा ऑनलाईनचा पर्याय आहे असे सांगितले. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. सदस्यांची निवड करण्यात आली.

सभापती पदासाठी हालचाली सुरु

स्थायी समितीत हर्षकुमार रेलन, प्रतिभा चौधरी, शीतल नवले हे सभापती पदासाठी इच्छूक आहेत. परंतू वरीष्ठ नेते हे सभापतीचे नाव निश्चित करतील. त्यामुळे आतापासून सभापतीपद मिळावे म्हणून हालचाली सुरु आहेत. विद्यमान सभापती संजय जाधव यांची मुदत 31 जानेवारीला संपत आहे. त्यामुळे स्थायीच्या विशेष सभेत सभापतीची निवड करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com