महापालिकेत लसीकरणासाठी बँक अधिकार्‍यांची बैठक

महापालिकेत लसीकरणासाठी बँक अधिकार्‍यांची बैठक

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरांमध्ये शंभर टक्के कोविड प्रतिबंधक लसीकरण (Covid preventive vaccination) व्हावे म्हणून शहरातील सर्व बँकांच्या व्यवस्थापकांनाची (Bank Officers) बैठक (Meeting) महापालिकेत (Municipal Corporation) घेण्यात आली.

आयुक्त देविदास टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली बँक व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बँकांनी आपल्या खातेदारांनी लसीकरण केले आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. लसीकरण केलेले नसेल तर लस घेण्याबाबत बँक अधिकार्‍यांनी खातेदारांना सूचना द्याव्यात. असे निर्देश आयुक्त टेकाळे यांनी दिले.

लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट्य पुर्ण करण्यासाठी महापालिकेने विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून आज बँक अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com