पाचशे रुपयांच्या 458 बनावट नोटांसह साहित्य जप्त

सावळदेत बनावट नोटांची छपाई, दोघांना केली अटक, पोलिसांची कामगिरी
पाचशे रुपयांच्या 458 बनावट नोटांसह साहित्य जप्त

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील सावळदे (Savaḷade) येथील छापा टाकून पोलिसांनी (Police raided) केलेल्या कारवाईत हुबेहुब 500 रुपयांच्या नोटांसारख्या (notes) दिसणार्‍या 458 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. दोन लाख 29 हजार रुपयांच्या या बनावट नोटांसह (Fake notes) प्रिंटर मशिन व साहित्य जप्त करुन दोघांना अटक (Both arrested) केली आहे.

शिरपूर पोलिस ठाण्याचे निरिक्षक रवींद्र देशमुख (Inspector Ravindra Deshmukh) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बुधवारी दुपारी सावळदे गावात छापा टाकण्यात आला. धनंजय दिलीप शिरसाठ (Dhananjay Dilip Shirsath) (कोळी) याच्या घरावर सापळा रचून पोलिसांनी छापा (raided) टाकला असता घरच्या वरच्या मजल्यावरील खोलीत शोकेसमध्ये नोटा छापण्याचे मशिन तसेच 500 रुपये दराच्या बनावट नोटा, (Fake notes) कागद आढळून आले.

धनंजय कोळी याने काही दिवसांपुर्वीच अशाच नोटांची छपाई करुन गावातीलच मुकेश प्रल्हाद कोळी यास दिल्याचे पोलिसांना समजले. सराईत गुन्हेगार असलेल्या मुकेश कोळीच्या घरीही पोलिसांनी छापा घातला शिवाय त्याच्या अंगझडतीत बनावट 500 रुपयांच्या (Fake notes) नोटांचे दोन बंडल आढळून आले. इलेक्ट्रीक फिटींगचे साहित्य, रिकामे खोके, कागद, कागदाचे तुकडे, कटर, मोजमाप पट्टी असे साहित्य पोलिसांनी जप्त करुन दोघांची मिळून दोन लाख 29 हजार रुपयांच्या बनावट नोटा (Fake notes) ताब्यात घेल्या आहेत. धनंजय व मुकेश या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.(Both arrested)

निरिक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक किरण बार्हे, उपनिरिक्षक संजय मुरकुटे यांच्यासह पथकातील लादूराम चौधरी, ललित पाटील, विनोद अकडमल, गोविंद कोळी, प्रवीण गोसावी, मनोज दाभाडे, अनिता पावरा, नूतन सोनवणे, रोशणी पाटील, प्रतिभा देशमुख यांनी ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com