आतेभावानेच केली मामेभावाची हत्या

भावी वकील निघाला मारेकरी, स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेची कारवाई
आतेभावानेच केली मामेभावाची हत्या

धुळे Dhule । प्रतिनिधी

उसनवारी पैशांच्या वादातून (loan dispute) तिक्ष्ण हत्यार व दगडाने ठेचून आतेभावाने (Atebhavane) मामेभावाची (cousin) हत्या (Murder) केल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेने (local criminal investigation branch) उघडकीस आणले आहे. हत्या करणारा भावी वकील असून त्याला अटक करण्यात आली आहे.

दि. 16 डिसेंबर 2021 रोजी सोनगीर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे निकुंभे, ता. धुळे शिवारात जंगलात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आला. याबाबत पोकॉ विजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन भादंवि 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व सोनगीर पोलीस ठाण्यातर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क करुन मयताचा फोटो व्हायरल करण्यात आला. दि. 20 डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून मृताची ओळख पटली. गोरक्षनाथ विठ्ठल पाटील (वय40) व्यवसाय ड्रायव्हर, मुळ रा. नगाव, हल्ली मु. प्लॉट नं. 33 ब, साई कॉलनी, अरुणनगर, वडेलरोड, देवपूर धुळे हे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखा यांनी गुन्ह्याचा तपास हाती घेतला. मयताच्या कौटुंबिक व आर्थिक बाजूचा अभ्यास करुन मयत गोरक्षनाथ पाटील याचा आतेभाऊ गजानन सजन देवरे (पाटील) (वय42) रा. भोकर याच्यावर संशय पोलिसांचा बळावला. विविध साक्षीदारांकडे याबाबत चौकशी करण्यात आली. परंतू गजानन देवरे हा एलएलबीच्या तिसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत असून त्याचा कायद्याचा अभ्यास असल्याने त्याला पळवाटा माहिती असल्याने त्याचा तो वापर करीत होता. परंतू स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी संशयिताच्या वर्तनाचा व देत असलेल्या उत्तरांचे विश्लेषण करुन तपास सुरु केला. त्यानंतर गजानन सजन देवरे याने गुन्ह्याची कबुली दिली.

मयत गोरक्षनाथ पाटील हा गजानन देवरे याचा नातेवाईक असून मामेभाऊ गोरक्षनाथ पाटील याच्याकडे दुधाची व वेळोवेळी घेतलेल्या उसनवारीची उधारी वाढत गेली. उधारी ही सुमारे चार लाखापर्यंत गेल्याने गजानन देवरे हा आतेभावाकडे उसनवारी पैशांची मागणी करीत होता. दि. 15 डिसेंबर रोजी चिचगाव ढंडाणे, ता. धुळेकडे मोटार सायकलीने जात असतांना त्यांचा उसनवारी पैशाच्या व्यवहारावरुन वाद झाला. त्यात गजानन याने तिक्ष्ण हत्यार व दगडाने ठेचून गोरक्षनाथ पाटील याची हत्या केली. व त्याची ओळख पटणार नाही अशा अवस्थेत सोडून तेथून फरार झाला. त्यानंतर मयताच्या अंत्यविधीच्या सर्व कार्यक्रमात हजर राहून कोणासही संशय येणार नाही असा वावरत राहिला. परंतू अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.

‘यांनी’ आणला गुन्हा उघडकीस

पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश पाटील, उपनिरिक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, योगेश राऊत, पोहेकॉ संजय पाटील, संतोष हिरे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, योगेश चव्हाण, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, योगेश जगताप, किशोर पाटील, सुनिल पाटील, मनोज महाजन, विशाल पाटील, गुलाब पाटील यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com