विवाहितेची फसवणूक, पतीविरुद्ध गुन्हा

विवाहितेची फसवणूक, पतीविरुद्ध गुन्हा

धुळे । dhule

मानसोपचाराकडे ट्रिटमेंट (Treatment to psychiatry) सुरू असल्याचे लपवून ठेवून विवाह (Marriage) लावून विवाहितेची फसवणूक करण्यात आली. त्यानंतरही तिचा छळ केला. म्हणून पतीसह (Husband) सात जणांवर पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवपूरातील नकाणे रोडवरील आदर्श कॉलनीत राहणार्‍या पुजा नितेश ठाकरे (वय 25) या विवाहितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचे पती नितेश रमेश ठाकरे याच्यावर सुमारे पाच ते सहा वर्षापासून नाशिक येथील मानोसोपचार तज्ज्ञ डॉ.आनंद पाटील यांच्याकडे ट्रिटमेंट सुरू होती. ही बाब लपवून ठेवून विवाह (Marriage) लावून घेतला. त्यानंतर व्यवसायासाठी माहेरून दहा लाख रूपये आणावे, यासाठी तिचा सासरी छळ करण्यात आला.

तिला क्रुर वागणून देत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच घरातून माहेरी हाकलून दिले. त्यावरून पती नितेश ठाकरे, सासरे रमेश जग्ननाथ ठाकरे, सासु रंजना रमेश ठाकरे, जेठ दिनेश रमेश ठाकरे, मामसासरे गुलाब जयवंत भामरे, धनराज जयवंत भामरे सर्व (रा. नाशिक) व आजसासरे जयवंत दगा भामरे (रा. नाडसे ता. साक्री) याच्याविरूध्द गुन्हा नोंद झाला आहे. तपास असई पिंपळे करीत आहेत.

Related Stories

No stories found.