कपाशीच्या आड पिकविला गांजा

रोहिणीत शिरपूर तालुका पोलिसांचा छापा, आठ लाखांची झाडे जप्त, एकावर गुन्हा
कपाशीच्या आड पिकविला गांजा

धुळे Dhule | प्रतिनिधी

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील रोहिणी गाव शिवारात (Rohini Village Shivarat) कपाशीच्या (cotton) आड होत असलेल्या गांजा शेतीवर (Cannabis Farming) काल तालुका पोलिसांनी (Taluka Police) छापा (raiding) टाकत कारवाई (action) केली. आठ लाखांची गांजाची झाडे जप्त (Confiscation of marijuana plants) करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रोहिणी गाव शिवारात ठेमश्या जमाल पावरा (रा. चिखरखानपाडा, रोहिणी ता. शिरपूर) याने त्याचे शेतात स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी वन जमिनीत कपाशीच्या पिकात बेकायदेशीरपणे मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवून आणणार्‍या गांजा सदृष्य अंमली पदार्थाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने दुपारी चार वाजेच्या सुमारास रोहिणी शिवारात शोध घेत गांजा शेतीवर छापा टाकला. शेतातून तब्बल ३९१ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. त्याची किंमत ७ लाख ८३ हजार ३२० रूपये इतकी आहे. याप्रकरणी असई कैलास जाधव यांच्या फिर्यादीवरून ठेमश्या पावरा याच्या विरोधत एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भिकाजी पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बोरकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गर्शनाखाली सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई भिकाजी पाटील, पोसई संदीप पाटील, पोहेकॉ अनिल चौधरी, संजय माळी, पवन गवळी, अनिल चौधरी, जाकीर शेख, पोना संदीप ठाकरे, अरिफ पठाण, सागर ठाकूर, मोहन पाटील, संजय चव्हाण, पोकॉ जयेश मोरे, योगेश मोरे, प्रकाश भिल, रोहिदास पावरा, संतोष पाटील, इसरार जकाउल्ला फारुकी यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com