
धुळे Dhule । प्रतिनिधी
संपुर्ण जिल्ह्यासाठी विकास वाहिनी ठरणार्या महत्वाकांक्षी मनमाड-इंदूर (Manmad-Indore) रेल्वे (train) मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे धावणारच तसेच अक्कलपाड्याच्या जलवाहिनीचे काम (Water duct work) पुर्णत्वास येत असल्याने येत्या काही दिवसात धुळेकरांना दररोज अथवा दिवसाआड पाणी (Water) मिळेल असे खा. डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी सांगितले.
शहरातील मिल परिसरातील शाळा क्र. 28 च्या लगत असलेल्या महापालिका (Municipal) दवाखान्याच्या (Hospital) इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी खा. भामरे हे बोलत होते.
यावेळी महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर भगवान गवळी, स्थायी सभापती शीतल नवले, आयुक्त देविदास टेकाळे, माजी महापौर जयश्री अहिरराव, नगरसेविका कल्याणी अंपळकर, योगीता बागुल, आरती पवार, हिरामण गवळी, अमोल मासुळे, संतोष खताळ, सुरेखा उगले, वंदना मराठे, डॉ. लिलावती सुभाषचंद्र राजवाडे, डॉ. चेतन राजवाडे, डॉ. अग्रवाल आूदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना खा. भामरे म्हणाले की, प्रदूषणमुक्त (Pollution free) धुळ्यासाठी एमआयडीसीतील कारखाने तसेच 11 हजार रिक्षा सीएलजीवर धावतील व पाईपलाईनद्वारे घराघरात गॅस (Gas) पोहचवला जाईल. असे त्यांनी सांगितले. महापौर कर्पे म्हणाले की, धुळ्यात महापालिकेचे 13 दवाखाने आहेत. मात्र हा दवाखाना धुळ्यासाठी मॉडल ठरावा असे त्यांनी सांगितले.