चेसीस नंबरमध्ये हेराफेरी, रिक्षाचालकावर गुन्हा

चेसीस नंबरमध्ये हेराफेरी, रिक्षाचालकावर गुन्हा

धुळे । Dhule

रिक्षाच्या चेचीस व इंजिन नंबरमध्ये हेराफेरी केल्याप्रकरणी रिक्षा चालकाविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत वाहन निरीक्षक सुजीतकुमार बाविस्कर यांनी चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास दसेरा मैदान परिसरात एमएच 15/ झेड 1447 क्रमांकाची रिक्षाची तपासणी केली. तेव्हा तिच्या मूळ चेचीस व इंजिन नंबरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले.

ही फेरफार हारुण हसन शेख, (रा.मुस्लीम नगर, हजार खोली, धुळे) याने केली असल्याचा संशय असून त्याच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नासिर पठाण तपास करीत आहेत.

आरटीओ कार्यालयांमध्ये असलेल्या कागदपत्रांच्या आधारे बनावट चेचिस व अन्य त्रृट्या समोर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे खळबळ उडाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com