धुळे जिल्ह्यात ४९ गावांमध्ये पशुधनास लम्पी रोगाची लागण

सतर्कता म्हणून बाधित गावे घोषीत-जिल्हाधिकारी

संगहीत चित्र
संगहीत चित्र

धुळे । प्रतिनिधी dhule

जिल्ह्यातील 49 गावांमध्ये पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाली असून त्यामुळे ही गावे बाधित क्षेत्र व रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून पाच किमी त्रिज्येचा परिसर सतर्कता परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

जिल्ह्यात चार तालुके असून त्यातील धुळे तालुक्यातील देवभाने, सातरणे, न्याहळोद, विंचुर, सडगाव, फागणे, अजनाळे, बोरविहीर, धुळे शहर, चिंचखेडा, अकलाड, नवलाणे, सोनगीर, बाबरे, बुरझड, कुसुंबा, तरवाडे, लामकानी, आर्वी, शिरुड, शिरपूर तालुक्यातील थाळनेर, विखरण खुर्द, सुकवद, अहिल्यापूर, जातोडा, तर्‍हाडी, खारीखाण, भोरटेक, शिंदखेडा तालुक्यातील धावडे, मालपूर, दोंडाईचा शहर, विखरण, दलवाडे, चिरणे, खर्दे, आरावे, साक्री तालुक्यातील आमोदे, वाघापूर, दिघावे, जैताणे, कुत्तरमारे, कढरे, सुकापूर, साक्री शहर, बल्हाणे, लव्हारतोंडी, रोहोड, जामादे, वाल्हवे या 49 गावांमध्ये पशुधनाला लम्पी आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यातील हे 49 गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या बाधित गावांपासून दहा किमी त्रिज्येच्या परिसरातील गोवंशीय जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, यात्रा, पशु प्रदर्शने पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत. बाधित गावांमध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चार्‍यासाठी पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवावे, बाधित व अबाधित जनावरे वेगळे बांधावे, रोगाने ग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी, असे आदेश जिल्हाधिकारी गोयल

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com