मुलींचा जन्मदर कमी, केंद्रांची तपासणी करा

जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश, कायद्याची सक्त अंमलबजावणी व्हावी
मुलींचा जन्मदर कमी, केंद्रांची  तपासणी करा

धुळे Dhule । प्रतिनिधी

गर्भधारणपूर्व (Prenatal) व प्रसुतीपूर्व (prenatal) निदानतंत्र कायद्याची (diagnostic law) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी धुळे जिल्ह़्यात मुलींचा जन्मदर कमी (Low birth rate of girls) असलेल्या तालुक्यामधील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी (Inspection of sonography centers) करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी आज दिलेत.

गर्भधारणपूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता पथकाची मासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे, धुळे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. सी. पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ. संपदा कुलकर्णी, डॉ. भूषण काटे, पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव, समुपदेशक अ‍ॅड. मीरा माळी यांच्यासह सर्व तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक, महापालिकेचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील संशयित सोनोग्राफी केंद्रावर डिकॉय केसेस कराव्यात. जिल्ह्याच्या सीमेलगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे याबाबत अधिक सर्तकता बाळगावी. जिल्ह्यात या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.

धुळे जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रात 41, तर धुळे महानगरपालिका क्षेत्रात 88 सोनोग्राफी केंद्र असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वानेरे यांनी बैठकीत दिली. त्याचबरोबर जिल्ह्यात गर्भधारणपूर्व व प्रसुतीपूर्व निदान होत असल्यास अशा सोनोग्राफी केंद्राबाबत टोल फ्री क्रमांक 18002334475, पीसीपीएनडीटी धुळे केंद्राच्या 8080214719 आणि amchimulgi.gov.in या वेबसाईट तक्रार करण्याचे आवाहनही डॉ. वानेरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com