धुळ्यात विहिरीत पडलेल्या महिलेला जीवदान

धुळ्यात विहिरीत पडलेल्या महिलेला जीवदान

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील विनोद नगरात विहिरीत पडलेल्या (Lying in the well) महिलेला (woman) अग्निशमन दलामुळे (fire brigade) जिवदान (Life saving) मिळाले आहे. छतावर वाळत घातलेले कपडे उडून विहिरीत पडल्याने ते पाहण्यासाठी गेली असता महिला विहिरीत पडली. माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

विनोद नगरात राहणारी 35 ते 40 वर्षीय महिला (woman) काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास छतावर वाळत घातलेले कपडे (Drying clothes) काढण्यासाठी गेली होते. त्यादरम्यान काही कपडे हवेने उडून खाली पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. जवळच विहिर असल्याने या विहिरीतही कपडे पडले (Clothes also fell in the well) असावेत, अशी शक्यता व्यक्त केली. त्यानंतर विहिरीत डोकावून पाहत असतांना महिलेचा अचानक विहिरीत तोल गेला.(balance is gone.)

ही विहिर तब्बल दीडशे फुट खोल व त्यात सुमारे 25 ते 30 फुटापर्यंत पाणी होते. महिलेने प्रसंगावधान राखत मोटारीच्या दोरला (Holding the rope) पकडून ठेवत वाचविण्यासाठी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दलाचे (fire brigade) फायरमन शाम कानडे, कुणाल ठाकूर, पांडूरंग पाटील व वाहनचालक सिध्दार्थ खैरनार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ दोरची शिडी विहिरीत टाकून महिलेला शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले. सुमारे 20 ते 25 मिनीटे ही महिला विहिरीत होती. दरम्यान नागरिकांनी अग्नीशामक दलाच्या कामगिरीचे कौतूक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com