उंटावद शिवारात बिबट्याचा वावर

शेतमजुरांना दिसल्याने घबराटीचे वातावरण; वनविभागाच्या पथकाकडून शोध मोहिम
उंटावद शिवारात बिबट्याचा वावर

बोराडी/कुरखळी Boradi / Kurkhali। वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील उंटावद (Untavad) शिवारात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेतात कामासाठी जाणार्‍या मजुरांना (laborers) बिबट्या (Leopards) दिसला. त्यामुळे त्यांच्यासह शेतात काम करणारे मजूर देखील हातातले काम सोडून सैरावैरा पाळायला लागले.

याबाबत शिरपूर वनविभागाला माहिती मिळाली. वनपाल पी.एच.माळी यांच्यासह राउंड स्टाप व नेचर कझर्वेशन फोरमचे योगेश वारुळे हे घटनास्थळी दाखल दाखल झाले. त्यांनी पगमार्कचा शोध सुरू केला. मजुरांना दिसणारा वन्यप्राणी नेमका बिबट आहे कि अन्य दुसरा कोणी हे पडताळत असतांना पगमार्ग दिसून आला.

त्यावरून प्राणीमित्र योगेश वारुळे यांच्यासह वनपाल माळी यांनी खात्री केली की दिसून आलेला पगमार्क(पायाचे ठसे) हे बिबट या वन्यप्राण्याचे असण्याची दाट शक्यता आहे. त्यावरून वनविभागाच्या वरिष्ठांना घटनेची माहिती देऊन पुढील कार्यवाही वनपाल पी.एच.माळी व राउंड स्टाप करीत आहे. नागरिकांमध्ये वन्यप्राण्याची दहशत निर्माण झाली आहे.

जेमतेम पाऊस थांबून एक दिवस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीकामाची लगबग सुरू झाली. त्यातच बिबट्याचे शेतात दर्शन झाल्याने शेतकर्‍यांसह मजुरांमध्ये भिती निर्माण झाली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.