सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सवानिमित्त महानायिकांवर व्याख्याने

सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सवानिमित्त महानायिकांवर व्याख्याने

मराठा सेवा संघातर्फे आयोजन

कापडणे Kapadane । प्रतिनिधी

जिल्हा मराठा सेवा संघ (District Maratha Seva Sangh) व जिजाऊ ब्रिगेडतर्फे (Jijau Brigade) गेली अनेक वर्ष, दि. 3 ते 12 जानेवारी दरम्यान सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव (Savitri-Jijau Dasharatrotsav) देशभरात साजरा केला जातो. यानिमित्त यावर्षी विविध महानायिकांवर व्याख्यानांचे (Lectures) आयोजन करण्यात आले आहे. दि.10 व 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह तसेच यु ट्युबवर लाईव्ह करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्याभरात मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविले जातात. यात बहुजन महानायिकांच्या जिवनचरित्रांवर व्याख्याने व महिला सक्षमीकरणाचे दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दि. 10 व 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात विविध बहुजन महानायिकांच्या जिवनचरित्रांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 10 रोजी सायंकाळी 5 वाजता सावित्रीमाई फुले, महाराणी येसूबाई, महाराणी ताराराणी, अहिल्यामाई होळकर, रमाई आंबेडकर या महानायिकांच्या जीवनावर अनुक्रमे प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी, सुधर्मा सोनवणे, सिमाताई वाघ, नुतनताई पाटील, प्रा.डॉ. सुर्यवंशी प्रकाशझोत टाकतील. सुत्रसंचालन एस.एम. पाटील व प्रेमचंद अहिरराव हे करतील.

तर दि.11 रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, डॉ.रखमाबाई राऊत, सावित्री जिजाऊ यांच्या जीवनावरील महाकाव्य, फातिमाबी शेख, क्रांतीविरांगणा लिलाताई पाटील या महानायिकांवर अनुक्रमे सुनिता साळुंखे, डॉ.सुलभाताई कुंवर, प्रा.अर्चना साळुंखे, सुलभा देसले व प्रेमचंद अहिरराव बोलतील.

सुत्रसंचलन प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी हे करतील. मराठा सेवा संघ धुळे च्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वर, घरबसल्या लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com