
शिंदखेडा Shindkheda । प्रतिनिधी
तालुक्यातील विखरण (देवाचे) येथील श्री द्वारकाधीश संस्थानच्या (Shri Dwarkadhish Sansthan) पायी दिंडीने (Dindi) काल विठ्ठलाचे नामस्मरण (Remembrance of Vitthal) करीत टाळ, मृद़ृंगाचा गजरात श्री क्षेत्र पंढरपूरकडे (Shri Kshetra Pandharpur) प्रस्थान (Departure) केले. तालुक्यासह परिसरातील भाविकांनी दिंडीत सहभागी होवून शुभेच्छा दिल्या. यामुळे गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते.
विखरण (देवाचे) येथील पायी दिंडी (Dindi) ही जिल्ह्यातील प्रथम व बहुतांश दिंड्यांचे उगमस्थान म्हणूनही ओळखली जाते. या दिंडीने आजपर्यंत अनेक नवरत्न निर्माण केले आहेत. तसेच वै. हभप नथ्थुसिंग बाबा हे सुद्धा प्रथम विखरण येथील दिंडीसोबत पायी पंढरपूर गेले व संत पदाला प्राप्त झाले. अशीही दिंडी परंपरा श्री.विठ्ठल स्वामींनी सुरू केल्यानंतर श्री.श्रीनिवास महाराज, श्री. जयकृष्ण महाराज, श्री.ज्ञानेश्वर महाराज व श्री.शंकर महाराज यांनी समर्थपणे चालवली. ती आजतागायत सुरू आहे. दिडवर्षांपूर्वी वै. शंकर महाराजांचे देहावसान झाले. तरीही दिंडी कोरोना काळातही श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी वारकर्यासह गेली होती. सध्या अशोक महाराज (टिल्लू) हे दिंडीचे (Dindi) नियोजन पाहतात.
इ.स. 1948-49 हे रझाकरांचे वर्ष तसेच 2020-21 हे कोरोनाचे वर्ष इतक्या कठीण काळातही विखरण संस्थानचा पायी दिंडीचा नियम ईश्वराने अबाधित ठेवला. दिंडी श्री क्षेत्र विखरण येथून निघून चौगाव, भडणे, चिमठाणे, सोनगीर, धुळे, चाळीसगाव, कन्नड, वेरूळ, पैठण, करमाळा व्हाया करकंब या मार्गाने सुमारे 500 कि.मी.चा प्रवास 27 दिवसात करून श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि.8 जुलै रोजी पोहोचेल.
साधारणतः टिल्लू घराण्याकडे ही वारीची परंपरा (Wari tradition) शंभर वर्षांपासून आहे. सुमारे 1924 सालापासून टिल्लू घराणे स्वामींची पंढरपूर पायी वारी घेऊन जात आहे. यंदाची ही टिल्लू घराण्यातील 99 वी वारी असून पुढील वर्षी टिल्लू घराण्याचे सेवेचे शंभरावे वर्षे पूर्ण होत आहे. पुढेही श्री विठ्ठल स्वामी कृपेने ही सेवा अखंड सुरू राहो, अशी प्रतिक्रिया श्री द्वारकाधीश संस्थानचे हभप अशोक महाराज यांनी यावेळी दिली.
विशेषकरुन शिंदखेडा येथील वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ सेवेकरी डॉ.विश्वाराव भामरे, दीपक देशमुख, अर्जुन माळी, मोतिलाल पवार, बळीराम माळी, रमेश परदेशी, दिलीप परदेशी, निंबा माळी, हिलाल माळी, चंद्रसिंग गिरासे, भडणे येथील पांडुरंग माळी, चौगांव येथील आनंदा पाटील, दिनकर खरकार, उमेश नगरदेवळेकर आदींसह बालगोपाल, वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षक दिंडीत सहभागी झाले.