LCBची दमदार कामगिरी : इंजिन, चेसीस नंबरमध्ये फेरफार करुन 27 ट्रकांची विक्री ; दीड कोटींच्या ट्रका जप्त

ट्रान्सपोर्ट कमिशन एजंटसह आरटीओ एजंटला अटक
LCBची दमदार कामगिरी : इंजिन, चेसीस नंबरमध्ये फेरफार करुन 27 ट्रकांची विक्री ; दीड कोटींच्या ट्रका जप्त

धुळे - प्रतिनिधी dhule

येथील (Lcb) स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दमदार कारवाई केली. इंजिन व चेसीस नंबर (Engine and chassis number) बदलून (Truck) ट्रकांची हेराफेरी करणार्‍या ट्रान्सपोर्ट (Transport) कमिशन एजंट आणि (RTO) आरटीओ एजंटला जेरबंद करण्यात आले. अशाप्रकारे त्यांनी तब्बल 27 ट्रकांची विक्री केल्याचे समोर आले आहे.

त्यांच्याकडून सुमारे दीड कोटी रुपये किंमतीच्या बारा ट्रका जप्त करण्यात आल्या आहेत. देशभरात हे रॅकेट असल्याचा संशय जिल्हा पोलिस प्रमुख प्रविणकुमार पाटील (District Police Chief Pravin Kumar Patil) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

धुळे शहरातील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav), एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि पोलिस कर्मचारी उपिस्थत होते.

पोलिसांनी साजीद शेख,आरटीओ एजंट इफ्तेखार, अहमद अब्दुल जब्बार शेख उर्फ पापा एजंट (रा.ग.नं.1 तहसिल ऑफिस समोर,इकबाल रोड धुळे) या दोघांना ताब्यात घेतले असून यांच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि प्रकाश पाटील करीत आहेत.

एलसीबी पीआय हेमंत पाटील,एपीआय प्रकाश पाटील, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, हे.कॉ.श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, रफिक पठाण, संजय पाटील, रविंद्र माळी, संदीप पाटील, प्रकाश सोनार, गौतम सपकाळे, राहुल सानप,संतोष हिरे, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी,मयुर पाटील, तुषार पारधी, विलास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com