लता मंगेशकरांच्या आजोळी झाला 31 वर्षांनी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

लता मंगेशकरांच्या आजोळी झाला 31 वर्षांनी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

थाळनेर Thalner। वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील थाळनेर7 (Thalner) येथील संत गाडगे महाराज विद्यालयातील (Sant Gadge Maharaj Vidyalaya) 1991-1992 या वर्षाच्या दहावीतील विद्यार्थ्यांचा (students) स्नेहमेळावा (gathering) 31 वर्षांनी नुकताच संपन्न झाला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शामकांत ठाकरे (Principal Shamkant Thackeray) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रशांत निकम हे उपस्थित होते. या मेळाव्यासाठी सन1991-1992 या वर्षातील इयत्ता दहावीचे 90 विद्यार्थी व विद्यार्थिनी (students) सहभागी झाले होते. यावेळी त्यावेळचे शिक्षक व कर्मचारी यांचा सत्कारही (Hospitality) करण्यात आला.

या मेळाव्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वांनी जुन्या बालपणीच्या आठवणींना उजाळा (Brighten up the memories) दिला. यावेळी स्वरा नारी एनजीओ तर्फे वंदना मराठे यांनी विधवा महिलांना कशी मदत करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात विधवा महिलांना आर्थिक सहकार्य करण्याचा एक चांगला निर्णय घेण्यात आला.

या स्नेहमेळाव्याचे (gathering) आयोजन करून सर्वांना एकत्र आणून मैत्रीचा एक आदर्श गावात व परिसरात निर्माण केला. समाजातील विधवा महिलांना आर्थिक सहकार्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

या मेळाव्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ता श्रीमती वंदना मराठे, प्राथमिक शिक्षिका सौ. संगीता बागुल, सौ. रंजना विसपुते, व्यवसायिक रेखा निळे, सौ.मनीषा पाटील, करवंदच्या माजी सरपंच सौ. वंदना पाटील, मुंबईचे पोलीस निरीक्षक योगेश ठाकूर, उद्योजक ज्ञानेश्वर गोराणे, मधुकर पानसरे, विनय वाघ, प्राथमिक शिक्षक हेमंत धाकड, मंगेश वाडीले, माध्यमिक शिक्षक किशोर मराठे, ग्रामपंचायत सदस्य अनिल मराठे, नवापूरचे उपप्राचार्य गणेश लोहार, आदर्श शेतकरी किरण निकम,किशोर महाले, ईश्वर मोरे आदींनी केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com