पाय विहिरीच्या स्वच्छतेसाठी अधिकार्‍यांचे श्रमदान

बारव स्वच्छता मोहीम अभियान: लळींग किल्लयाच्या पायथ्याशी असलेल्या विहीरीची साफसफाई
पाय विहिरीच्या स्वच्छतेसाठी अधिकार्‍यांचे श्रमदान

धुळे Dhule । प्रतिनिधी

शिवराज्यभिषेक दिनाचे ( Shivrajyabhishek day)औचित्य साधून पाणी व स्वच्छता विभाग (Water and Sanitation Department) जिल्हा परिषद (Zilla Parishad) धुळे, नेहरू युवा केंद्र (Nehru Youth Center) धुळे, आणि नेहरू युवा मंडळ म्हसाळे (ता.साक्री) यांच्या संयुक्त विद्यमाने लळिंग किल्लयाच्या (Laling Fort) पायथ्याशी असलेल्या पाय विहिरीची स्वच्छता (Cleaning of foot wells) करण्यासाठी श्रमदान मोहीम (Shramdan Mohim) राबविण्यात आली.

इतिहास कालीन विहिरी पुनर्जीवित (Historical wells revived) केल्यास त्यातून जल पातळी वाढण्यास मदत होऊन परिसरातील पाण्याचे स्रोत जिवंत होतील. या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ, नेहरू युवा मंडळाचे राजेंद्र माळी, सुरेश सूर्यवंशी, श्रीराम युवा फाउंडेशनचे वाल्मीक सोनवणे, ग्रामसेवक बी.एन. पाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

लळींग किल्लयांच्या (Laling Fort) पायथ्याशी इतिहासकालीन विहीर आहे. मात्र सद्यस्थितीत विहीरीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या विहिरीच्या अवती-भवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काटेरी झाडे झुडपे वाढली असून गावातील सांडपाणी विहिरीजवळ साचते. याच विहिरीच्या प्रवेशद्वारातच सार्वजनिक शौचालयाची टाकी असून कठड्याला लागूनच सार्वजनिक महिला शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे आजूबाजूला झालेली बांधकामे व मोठमोठी वाढलेली काटेरी झुडपे यामुळे ही विहीर (Cleaning of foot wells) असल्याचे लक्षात येत नाही.

विहिरीत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्यामुळे विहीर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या विहिरीची स्वच्छता (Cleaning of wells) केल्यामुळे व त्यात असलेला कचरा काढल्यानंतर विहीर ही गावाला पाण्याच्या उपयोगासाठी वापरात येणार असून पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. बारव स्वच्छता मोहीम अभियान (Barav Sanitation Campaign) अंतर्गत विहिरीची संपूर्ण गाळ, केर कचरा काढून स्रोत जिवंत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठी श्रमदान उपक्रमांचे नियोजन केले जात आहे. दि.6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर विहीर 40 ते 50 फुट खोल आहे. त्यामध्ये माती मिश्रित कचरा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. काही वर्षांपूर्वी महामार्गावर नवीन गावाजवळ सिमेंट नेणार्‍या वाहनाचा अपघात झाला होता, त्या वाहनातील सिमेंटच्या कुंड्या या विहिरीत टाकण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यासाठी तांत्रिक यंत्रणेची गरज आहे. या लोकाभिमुख कामासाठी व ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी दानशूर व्यक्ती शिवप्रेमींनी सहभाग नोंदवावा तसेच अवजार मनुष्यबळ पुरवून योगदान द्यावे, असे आवाहन दुर्गमित्र सुरेश सूर्यवंशी यांनी केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com