पत्नीच्या प्रियकराचे कारच्या डीक्कीत कोंबून अपहरण, तिघांवर गुन्हा

पत्नीच्या प्रियकराचे कारच्या डीक्कीत कोंबून अपहरण, तिघांवर गुन्हा

सोनगीर Songir । वार्ताहर

पत्नीच्या प्रियकराला (wife's boyfriend) कोयत्याचा धाक दाखवून कारच्या डीक्कीत (car deck,) कोंबून अपहरण (Kidnapping) केल्याचा प्रकार तालुक्यातील सोनगीर येथे घडला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संदीप ईश्वर गायकवाड (Sandeep Ishwar Gaikwad) (वय 34 रा. चित्तोड ता. धुळे) सोनगीर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याचे सोनगीर येथील एका आरोपीच्या पत्नीशी (accused's wife) प्रेमसंबंध (Love affair) आहेत. या कारणावरून त्या महिलेच्या पतीसह तिघांनी काल दि. 24 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गायकवाड याला सासर्‍यााच्या घरी नेवून हाताबुक्यांनी मारहाण (Beating) केली. कोयत्याने कापुन ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून कारच्या डिक्कीत जबरीने कोंबले. जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण (Kidnapping) करून गोंदूर येथे घेवुन गेले. म्हणून तिघांवर सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रविंद्र महाले करीत आहेत.

Related Stories

No stories found.