खान्देश अस्मिता आणि विकासासाठी लढा दिला - रोहिदास पाटील

खान्देश अस्मिता आणि विकासासाठी लढा दिला - रोहिदास पाटील

धुळे Dhule । प्रतिनिधी

खान्देशाचा विकास (Development of Khandesh) व्हावा आणि खान्देशाची अस्मिता (Khandesh's identity) टीकून रहावी म्हणून राजकारणासह सर्वच क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना संघटीत करुन खान्देशाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. आज खान्देशातील अनेक विकासात्मक आणि विधायक कामांना माझा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हातभार लागला आहे. यापुढेही खान्देशासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम (Work together) करण्याचे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील (Former Minister Rohidas Patil) यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक संघांची मातृसंस्था असलेल्या शिवतीर्थ ज्येष्ठ नागरीक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज दि.9 जानेवारी रोजी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील हे बोलत होते. प्रारंभी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, अनाथांची माय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्यासह वर्षभरात निधन पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरीक संघातर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील आणि माजी आ.राजवर्धन कदमबांडे यांचा कृतज्ञता म्हणून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिवतीर्थ ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.जे.टी.देसले यांनी केले.

एम.एस.पाटील म्हणाले की, धुळ्यात अ‍ॅडव्होकेट चेंबर्संच्या कामात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. सामान्य व्यक्तीसाठी लढणारे व्यक्तीमत्व म्हणून माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा उल्लेख करावा लागेल असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना रोहिदास पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नागरीकांच्या आधारासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी आजही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. धुळे जिल्हयासह खान्देशात सर्वसामान्य माणसाला नीटपणाने उभे करण्याचे काम मी नेहमीच केले आहे. खान्देशाच्या विकासासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच राजकिय पक्षातील लोकप्रतिनीधी तसेच इतर सर्व क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींना वेळोवेळी एकत्र केले आणि खान्देशाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. मंत्रीपदाच्या काळात उत्तर महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या कामांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करुन विकासासाठी योगदान दिले आहे. या पुढील काळात उत्तर महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी केले.

यावेळी माजी आ.राजवर्धन कदमबांडे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.जे.टी.देसले. निवृत्त अभियंता प्रभाकर पाटोळे, अतिरिक्त माजी जिल्हाधिकारी हिरालाल वसईकर, अ‍ॅड.एम.एस.पाटील, श्री. झांझरीवाल, माजी प्राचार्य व्ही.के.भदाणे, के.डी.लोखंडे, डी.व्ही.खैरनार, संतोष सुर्यवंशी, जयश्री शाह, पी.सी.पाटील, सुलभा कुंवर, एन.पी.वाणी, बी.एन.पाटील, डी.व्ही.खैरनार, सुभाष पवार,सौ.चंपावती अग्रवाल आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सचिव के.बी.बागुल यांनी केले.

Related Stories

No stories found.