चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव मंदीर सजले

चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव मंदीर सजले

धुळे । Dhule प्रतिनिधी

चंपाषष्ठीनिमित्त (Champashashti) शहरातील श्री. खंडेराव महाराज मंदिरात (Khanderao Maharaj Temple) सजावट (Decoration) करण्यात आली असून उद्या दि. 29 नोव्हेंबर रोजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे (various religious events) आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी तळी भरण्याचा कार्यक्रम होत असल्यामुळे भरीताच्या वाग्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. भरीताचे वांगे 40 ते 50 रुपये किलो दराने विकले गेले.

चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव मंदीर सजले
कामगाराच्या घराला आग : बकर्‍यांच्या पाच पिलांसह 50 हजाराची रोकड जळून खाक

शहरातील जुन्या आग्रारोडवर प्राचीन श्री. खंडेराव महाराज मंदिर असून चंपाषष्ठीनिमित्त मंदिर सजविण्यात आले आहे. मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. श्री. खंडेराव महाराज मंदिरात दि. 29 नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठीनिमित्त दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 3 वाजेच्या दरम्यान भंडार्‍याचे कार्यक्रम होईल. भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन खंडेराव बाजार मित्र मंडळाने केले आहे.

चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव मंदीर सजले
महाराष्ट्र सशक्त करण्यासाठी महात्मा फुलेच्या मौलिक विचारांची गरज : माजी कुलगुरु डॉ.निंबा ठाकरे
चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव मंदीर सजले
VISUAL STORY : आयुष्यभर या 'दिवंगत' अभिनेत्याने शिकवली नात्यांना जपण्याची कला

वांग्यांना मागणी

चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी तळी भरण्यात येते. त्यामुळे वांगे, कांद्याची पात यांना मागणी वाढते. आज भरीताच्या वांग्यांना मागणी वाढल्यामुळे बाजार पेठेत तुटवडा जाणवला. भरीताचे वांगे 40 ते 50 रुपये किलो तर कांद्यांची पात 20 ते 25 रुपये किलो दराने विकली गेली. चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी तळी भरुन खंडेराव महाराजांचा जयघोष केला जातो व त्यादिवसापासून चार्तुमासाची समाप्ती होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com