जवळ बाळगला देशी कट्टा एलसीबीने ठोकल्या बेड्या

जवळ बाळगला देशी कट्टा एलसीबीने ठोकल्या बेड्या

धुळे ।dhule । प्रतिनिधी

दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा (Gavathi Katta) बाळगणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch team) पथकाने अटक (arrested) केली. त्याच्याकडून 25 हजारांचा एक गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे.

मोहंमद शाहीद रियाज अहमद (रा. हाजी नगर, इसाक मशिदीजवळ, धुळे) हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोबत देशी बनावटीचा गावठी कट्टा घेवून फिरत असत व तो सध्या चाळीसगाव रोड चौफुलीजवळ व्दारका लॉजजवळ उभा आहे, अशी माहिती दि. 2 रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

पथकाने त्याला व्दारका लॉज जवळून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेली पिस्टल (गावठी कट्टा) मिळुन आली. गावठी कट्टा पाहतांना मॅगझीनमध्ये एक काडतुस दिसून आली. 25 हजारांचे गावठी बनावटीचे पिस्तुल (गावठी कट्टा) व एक हजाराचे एक जीवंत काडतुस असा एकुण 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याच्याविरुद्ध पोना रविकिरण राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई योगेश राऊत, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोसई प्रकाश पाटील, पोहेकॉ अशोक पाटील, संदीप सरग, पोना. कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, पोकॉ. विशाल पाटील यांच्या पथकाने केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com