जेवण दिले नाही म्हणून पत्नीची केली हत्या

जेवण दिले नाही म्हणून पत्नीची केली हत्या

धुळे । Dhule । प्रतिनिधी

पत्नीने (wife) जेवण बनविले नाही (did not make the meal) याचा राग येवून लाकडी दांडक्याने पतीने (husband) तोंडावर व डोक्यावर मारहाण करुन पत्नीची हत्या (Wife beaten to death) केल्याची घटना लखाळे, ता. साक्री येथे घडली. निर्मला गणेश चव्हाण (वय35) असे मयत पत्नीचे नाव आहे.

ताहराबाद, ता. बागलाण येथे राहणारा गणेश एकनाथ चव्हाण याच्याशी निर्मलाचा प्रेम विवाह झाला होता. त्यांना चार मुले असून तिने जेवण बनविले नाही. याचा राग येवून गणेश याने निर्मलाशी वाद घातला. त्या वादातून गावातील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीच्या ओट्यावर निर्मलाला लाकडी दांडक्याने तोंडावर व डोक्यावर मारहाण करुन तिचा खून केला.

याबाबत सुरमल मंगळ्या पवार रा. लखाळे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन भादंवि 302 प्रमाणे गणेश चव्हाण विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गणेश चव्हाणला अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com