न्यायाधीश डी. यू. डोंगरे म्हणतात..मानसिक आरोग्यही सुदृढ राखा !

न्यायाधीश डी. यू. डोंगरे  म्हणतात..मानसिक आरोग्यही सुदृढ राखा !

शिरपूर Shirpur । प्रतिनिधी

न्याय पालिकेच्या (Judiciary) क्षेत्रात न्यायदानाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असतांना या क्षेत्रातील न्यायाधीश, वकील बांधव यांनी आपल्या शारीरिक आरोग्याकडे (Towards physical health) लक्ष देण्या सोबतच मानसिक आरोग्यही (mental health) सुदृढ राखले पाहिजे. असे आवाहन धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डी. यु. डोंगरे (Judge D. U. doṅgare) यांनी केले.

शिरपूर तालुका विधी सेवा समिती, (Shirpur Taluka Legal Services Committee) तालुका वकील संघ व आरोग्य विभाग, डॉक्टर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर न्यायालयात सर्व रोग निदान व उपचार शिबीर (Diagnosis and treatment camp) घेण्यात आले.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी न्यायाधीश डोंगरे हे बोलत होते. याप्रसंगी शिरपूर कोर्ट सह-दिवाणी न्यायाधीश व्ही. बी. शितोळे, शिरपूर न्यायालयातील सरकारी अभियोक्ता अवधूत भावसार, शिरपूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. महाजन, उपाध्यक्ष अ‍ॅॅड. युवराज ठोंबरे, शिरपूर वरवाडे नगरपरिषद एन. यू. एच. एम. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीतू बत्रा, शिरपूर डॉक्टर्स क्लब अध्यक्ष डॉ. मनोज परदेशी, शिबिराचे समन्वयक शिरपूर डॉक्टर्स क्लब माजी अध्यक्ष डॉ. योगेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना न्यायाधीश डोंगरे म्हणालेे की, आरोग्य सुदृढ राखण्यासाठी वेळोवेळी आपल्याला आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्या (Medical tests) करून वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार व औषधोपचार प्राधान्यक्रमाने करून घेतले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले.

न्यायाधीश संभाजी देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शिरपूर तालुका डॉक्टर्स क्लबचे सदस्य, शासकीय सेवेतील डॉक्टर्स व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी तसेच परिचारिका यांनी वाघाडी येथील फॅक्टरीत झालेल्या प्रचंड स्फोटाच्या वेळी तातडीने वैद्यकीय सेवा (Medical Services) उपलब्ध करून दिले होते तसेच कोरोना काळातही त्यांचे कार्य उल्लेखनीय व अभिनंदनीय आहे असे त्यांनी सांगितले.

या शिबिरात नगरपालिकेच्या (Municipalities) इंदिरा गांधी हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉ. पितांबर दिघोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निकम, डॉ. अमित गुजराथीं, डॉ. राखी अग्रवाल, डॉ. गुंजन पाटील, डॉ. सोनाली बोडके, डॉ. सुप्रिया पंतवैद्य, डॉ. शेखर पाटील, डॉ. मनोज गौड, डॉ. सुधीर भदाणे, डॉ. वीरेंद्र देसले, डॉ. दीपक गिरासे, डॉ. दीपक बागुल, डॉ. ललिता पवार, डॉ. साळुंखे यांनी वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार घेण्याच्या सल्ला व मार्गदर्शन केले.

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुवराज वाघ, शिरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, प्रभारी बीडिओ सचिन शिंदे, खर्दे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मनोज पाटील, डॉ. साळुंखे यांचेही सहकार्य लाभले. यासोबत कोरोना प्रतिबंधक पहिला डोस, दुसरा डोस व बूस्टर डोस देण्याची सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आली होती.

शिरपूर तालुका बार असोसिएशन अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. महाजन, उपाध्यक्ष ड. युवराज ठोंबरे, सचिव अ‍ॅड. किशोर सोनवणे, अ‍ॅड. कल्पना पाटील, अ‍ॅॅड. शालिनी सोनवणे, अ‍ॅड. निलेश पाटील, अ‍ॅड. नरेंद्र करंकाळ, अ‍ॅड. सानप, अ‍ॅॅड. निखिल सोनवणे, गिरासे, एन. डी. माळी, कुणाल राजपूत, अ‍ॅड. मेटकर, डी. आर. पाटील, गजानन पाटील, यु. एस. गुजराथी, पी. पी. ऐंडाईत, एस. पी. गिरासे यांचे सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.