दिवाळीनिमित्त जोषाबा संस्थेतर्फे दिव्यांगांना किराणा वाटप

दिवाळीनिमित्त जोषाबा संस्थेतर्फे दिव्यांगांना किराणा वाटप

सोनगीर ।Songir । वार्ताहर

येथील जोशाबा संस्थेतर्फे (Joshaba Institute) एन.जी. बागुल हायस्कूल येथे पन्नास अंध दिव्यांग (Blind cripple) बांधवांना दिवाळी (Diwali) सण साजरा करता यावा यासाठी किराणा किट, (Grocery kit) दिव्यांग भगिनींना भाऊबीज निमित्त 30 साड्यांचे वाटप (Allocation) करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनगीरच्या सरपंच श्रीमती रुखमाबाई ठाकरे या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.अमित दुसाने, माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन, विकास सोसायटीचे चेअरमन अशोक माळी, एम.टी. गुजर, एन.जी. बागुल हायस्कूल मुख्याध्यापक बी.एच. माळी, शेखर कुळकर्णी, एच.आर. सपकाळ, शालीक पाटील, रामचंद्र पाटील, विजया पाटील (अंध शिक्षिका धुळे) रोटरी क्लब चे हुसेन भाई विरदेलवाले, नरेंद्रसिंग गिरासे, भरतसिंग राजपूत, आनंदसिंग गिरासे (दोंडाईचा), डॉ.अजय सोनवणे, अनिल पाटील दापुरा, कैलास पाटील सोनगीर, राजेंद्र झेंडू महाजन, पि.के. शिरसाठ, जोषाबा संस्थेचे अध्यक्ष, दलित मित्र दिलीप माळी, उपाध्यक्ष अशोक माळी, सचिव वंदना माळी, संचालक देविदास बडगुजर, नंदलाल बडगुजर, रमेश मुकुंदा माळी, संतोष खैरनार, कुणाल माळी, छगन बडगुजर आदी उपस्थित होते.

अशोक गोविंदा माळी यांची सोनगीर विकास सोसायटी चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष दिलीप माळी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अंध दिव्यांग बांधवांच्या जीवनातही प्रकाश पडावा व आनंदाने दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने त्यांना किराणा वाटप करण्यात आला. अविनाश महाजन म्हणाले, दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराची खरी गरज आहे आणि ती व्यवस्था धुळे जिल्ह्यात नाही. तरी ती व्यवस्था होणे गरजेचे आहे. जेणेकरून दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.

ज्या दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराची गरज आहे स्वतःचा व्यवसाय करण्याची तयारी असेल तर आम्ही प्रशिक्षण देऊ, संपर्क करावा असे रोटरीचे हुसेनभाई विरदेलवाले यांनी सांगितले. अ‍ॅड.अमित दुसाने म्हणाले कार्य म्हणजे ईश्वरी कार्य आहे. त्यांनी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरा केली.

खरोखरच जोषाबा संस्थेचा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा उपक्रम आहे. अध्यक्षीय भाषणात श्रीमती रुखमाबाई ठाकरे यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांना सहानुभूती नव्हे तर मदतीची गरज आहे. त्यांना मदत करणे म्हणजे ईश्वरी मदत होईल आणि ते आपले नैतिक कर्तव्य आहे. यशस्वीतेसाठी मोहन सैंदाणे, आयुष्य पाटील, पियुष पाटील, हर्षल पाटील, कुणाल माळी, पवन माळी, दगडू धनगर, साई नंदलाल बडगुजर, सुनील प्रकाश माळी, कुंदन रामलाल माळी, महेंद्र माळी, आदींनी प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com