आर.सी. पटेल पॉलीटेक्निकच्या माध्यमातून 61 विद्यार्थ्यांना नोकरी

आर.सी. पटेल पॉलीटेक्निकच्या माध्यमातून 61 विद्यार्थ्यांना नोकरी

शिरपूर Shirpur। प्रतिनिधी

शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पॉलिटेक्निक (R.C. Patel Polytechnic) मध्ये भारत गीअर प्रायव्हेट लिमीटेड मुंबई (Bharat Gear Pvt. Ltd. Mumbai) या कंपनी तर्फे पुल कॅम्पस इंटरव्ह्यूचे (campus interviews) आयोजन करण्यात आले. यात एकूण 61 विद्यार्थ्यांना (students) नोकरी (Jobs) प्राप्त झाली असून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

आर.सी. पटेल पॉलिटेक्निक (R.C. Patel Polytechnic) मधील विद्यार्थी प्रेमराज पाटील, प्रणव पाकळे, प्रथमेश भोंगे, रोहीत कदम, सार्थक महाजन, सचिन सनेर, प्रथमेशकुमार गरेसीया, ललित ढाके, चेतन चव्हाण, मनिष बडगुजर, मंदार भट, दिपक बोरसे, रुपम पवार, कल्पेश पाटील, लोकेश बडगुजर, शेख झाकी मोहम्मद हानिफ, मयूर राजपूत, प्रशांत पाटील, पंकज पाटील, निलेश पाटील, भावेश पाटील, योगेश पाटील, हर्षल बडगुजर, जयेश महाजन, रोहन पवार, अक्षय पाटील, जगदिश धनका, साहील खैरनार, हितेश पाटील, कुणाल पाटील, विजय साळी, राज पाटील, कल्पेश भावसार, राहुल जैन, गणेश बडगुजर, चेतन भामरे, विक्की जाधव, अमन खाटीक, निखील मनोजसिंग राजपूत, निखिल राजेंद्रसिंग राजपूत, मंगेश सोनार हे 41 विद्यार्थी व इतर महृाविद्यालयाचे 20 असे एकूण 61 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.नवीन हासवाणी (Principal Dr. Naveen Haswani) यांच्या हस्ते कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे गृप लीडर सागर जगे, सिनिअर इंजिनिअर सिध्देश जगे, आर.डी. सिंग यांचे स्वागत करण्यात आले.

प्राचार्य डॉ.नवीन हासवाणी यांनी विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकरी (Jobs) मिळण्याचे फायदे, त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबाबत मार्गदर्शन(Skills guidance) केले. या उपक्रमाचे संयोजन मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा.ए.डी. पाटील, महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा.जयेश चौधरी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ए.एस. पाटील, प्रा.बी.एस.पाटील, हुजेफा शेख, निखिल बोरसे, निलेश पाटील यांनी प्रयत्न केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, प्राचार्य डॉ.नविन हासवाणी, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.