दोन लाखांच्या दागिन्यांची पर्स नवदाम्पत्याला केली परत

दोन लाखांच्या दागिन्यांची पर्स नवदाम्पत्याला केली परत

धुळे Dhule। प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड सिमा तपासणी नाक्यावर (Hadakhed border checkpoints) सुरक्षा रक्षकांना (security guards) दागिन्यांची पर्स (Jewelry purse) सापडली. त्याच दरम्यान पर्स शोधत आलेल्या नव दाम्पत्याला (newlyweds) त्यांनी पोलिसात (Police) हजर केले. पोलिसांनीही दाम्पत्याला धीर देत खात्री करत पर्स परत केली. पर्समध्ये पावणे दोख रूपये किंमतीचे दागिने होते. दरम्यान सुरक्षा रक्षकांच्या प्रामाणिकपणाचे दाम्पत्याने कौतूक केले.

नवविवाहीत दाम्पत्य आकीब मुख्तार मंसुरी (वय 25) व आसमा आकीब मन्सुरी (वय 22 रा. एकविरा देवी मंदीराजवळ, अमरधाम रोड, देवपूर, धुळे) हे दि. 23 जानेवारी रोजी दुपारी धुळ्याकडुन सेंधवा येथे दुचाकीने जाते होते. त्यादरम्यान त्यांनी दुचाकीला पर्स लावलेली होती. ती हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे आल्यावर दुचाकीवरून खाली पडली. मात्र ते पुढे निघुन गेले. ती पर्स सुरक्षा रक्षक महारु भास्कर पाटील, योगेश सामेनाथ अढकमल, कृष्णा कैलास माळी व मयुर ज्ञानेश्वर साळुखे यांनी उचलली. पर्समध्ये 2 तोळे वजनाचा नेकलेस, 7 ग्रॅम वजनाची रिंग, दीड ग्रॅमची नथनी, दहा ग्रॅमचे ब्रेसलेट, दोन ग्रॅमची नथ, तीन ग्रॅमची अंगठी तसेच 1 हजार रुपये रोख असा एकुण 1 लाख 72 हजार 700 रूपयांचा ऐवज होता.

दरम्यान पर्स रस्त्यात पडल्याचे लक्षात येताच नवविवाहीत दाम्पत्य पर्स शोधत हाडाखेड नाक्यावर आले. त्यांनी पर्स पडल्याबाबत सांगितल्यावर सुरक्षा रक्षकांनी नवविवाहीत दाम्पत्याला पर्ससह सांगवी पोलीस ठाण्यात हजर केले.

पोसई भिकाजी पाटील व असई नियाज शेख यांनी सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आधी घाबरलेल्या दाम्पत्याला धीर दिला. त्यांचे सांत्वन करुन पर्समधील दागिने व रोख रुपयांची खात्री केली. त्यानंतर ते त्यांना परत केले आहे. तसेच सुरक्षा रक्षकांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन त्यांना शाबासकी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com