कुरखळी फाट्याजवळ जैन कुंटूब बचावले

कुरखळी फाट्याजवळ जैन कुंटूब बचावले

कुरखळी Kurkhali । वार्ताहर

मुंबई- आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) कुरखळी फाट्यानजीक चालकाचा वाहनावरील ताबा (Possession of the vehicle) सुटल्याने कार दुभाजकावरून चारवेळा उलटली. या अपघातात (Accident) सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. तर वाहनाचा चुराडा झाला. चालकासह परिवारातील सदस्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वरून 1 वाजेच्या सुमारास पुणे येथील सोहनलाल कटारिया रा. वडगाव धायरी हे आई वडील, दोन मुली, पत्नी व वाहन चालक यांच्यासह असे सर्व जण एम.एच. 12 आर.के 9875 क्रमांकाच्या आरटीका कारने पुणे येथून मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथे जैन मुनींच्या दर्शनासाठी जात असतांना कुरखळी फाट्याजवळील हॉटेल हेरीटेजच्या समोर चालकाचा ताबा सुटल्याने आरटीका कार रस्त्यावरील दुभाजकावर धडकली व तीन ते चार वेळा उलटून विरुध्द दिशेच्या रस्त्यावर उलटली. सुदैवाने जिवीतहानी टळली तर फक्त चालकाला दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की कारचा वरचा भागाचा चुराडा झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हॉटेल हेरीटेज व पेट्रोल पंप वरील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केली. सुदैवाने या अपघातात चालक जखमी झाला असून इतर सदस्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे. त्यांना उपचारासाठी शिरपूर टोलवेच्या रुग्ण वाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी सचिन राजपूत, श्रीपाल राजपूत, जितेंद्र गिरासे, शक्तीराज राजपूत, पत्रकार योगेश्वर मोरे, कमलाकर जगदेव, जितेंद्र कोळी आदींनी मदत कार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com