मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र होणार निश्चित

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र होणार निश्चित

धुळे Dhule | प्रतिनिधी

धुळे Dhule व नंदुरबार Nandhurbar जिल्ह्यात नाफेडतर्फे Nafed केंद्र सरकारचे Central Government Cereals Green gram, urad, soybean खरेदी केंद्र Shopping center सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र इच्छुक संस्थांनी २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने The Maharashtra State Co-operative Marketing Federation केले आहे.

खरेदी केंद्र मंजूर करतांना जिल्हा, तालुकास्तरावरील अ वर्ग सभासद असलेले खरेदी- विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी अ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी दोन्ही अ वर्ग सभासद संस्था कार्यरत नसतील तेथे इतर सहकारी संस्थेस ब वर्ग सभासद करुन खरेदीचे काम देण्यात येईल. मात्र, ही संस्था किमान दोन वर्षांपूर्वी नोंदणी झालेली असावी.

खरेदी करणार्‍या संस्थेकडे साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला, मॉईश्चर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक चालविण्याची क्षमता असलेला जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, संगणक हाताळण्यासाठी प्रशिक्षित असलेला सेवक वर्ग, इलेक्ट्रॉनिक वजन काटा.

पुढील बाबींकरीता सहाय्यक निबंधक यांचे प्रमाणे पत्र घेण्यात यावे. त्यात वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे, भाड्याचे गोदाम असण्याबाबत, अन्नधान्य कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी- विक्रीचा किमान एक वर्षाचा अनुभवाचे प्रमाणपत्र, खरेदी केंद्र चालविण्यासाठी आवश्यक सेवक उपलब्ध असल्याचे, काळ्या यादीत, अपहार, फौजदारी गुन्हा यासंबंधी कार्यवाही झालेली नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

जिल्हा पणन अधिकार्‍यांनी द्यावयाची प्रमाणपत्रे, मागील वर्षीच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये ऑफलाइन खरेदी, गैरव्यवस्थापन न केल्याबाबतचा दाखला, खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत ना- हरकत प्रमाणपत्र, अ किंवा ब वर्ग सभासद आहे किंवा नाही, नसल्यास ब वर्गाचा प्रस्ताव सादर केला आहे काय आदी. इच्छुक खरेदी संस्थांनी २४ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com