व्यापार्‍याची फसवणूक करणारी ईराणी टोळी जेरबंद

मुद्देमाल हस्तगत
व्यापार्‍याची फसवणूक करणारी ईराणी टोळी जेरबंद

धुळे । Dhule

निजामपूर (ता. साक्री) येथील कांदा व्यापार्‍याला फसवून ऐवज लांबविणार्‍या ईराणी टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक लाखांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. तो न्यायालयाच्या आदेशाने व्यापार्‍याला सुपुर्द देखील करण्यात आला.

राजेंद्र रामचंद्र सोनवणे (वय 63 रा.निजामपुर) या कांदा व्यापार्‍याची काहींनी फसवणूक करत त्यांच्याकडील ऐवज लंपास केला होता. याबाबत निजामपूर पोलिसात गुन्हा नोंद होता. त्यानंतर सपोनि श्रीकांत पाटील यांनी असई शिरसाठ, पोकॉ चव्हाण, परदेशी यांना तपासकामी योग्य ते मार्गदर्शन केले.

प्रथम गुन्हयाचे घटनास्थळी दर्शन बिअर शॉपीचे सीसीटीव्ही फुटेजमधील संशयितांचे वर्णन, हालचाली पाहून गुन्हयाची एमओबीशी निगडीत ईराणी असल्याचे निदर्शनास आले. तसेच ईराणींची माहीती प्राप्त करुन त्यांचा मुख्य सुत्रधार अय्युब ऊर्फ भुर्‍या फयाज शेख (वय 54) याच्यासह पाच जणांना सर्व (रा.रमजानपुरा, मालेगाव) अटक केली.

यांच्याकडुन गुन्हयात गेलेला 25 ग्रॅमची सोन्याची चैन व 10 ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकुण 1 हजार 5 हजार रुपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला. तो न्यायालयाच्या परवानगीने फिर्यादी राजेंद्र सोनवणे यांना निजामपुर पोलीस ठाण्यात बोलावुन सपोनि योगेश राजगुरु यांनी सुपूर्द केला. यावेळी असई शिंदे, पोहेकॉ विपीन पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com