एटीएम बदलुन फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

एलसीबीची कामगिरी, 66 एमटीएम कार्ड, स्किमर मशिन जप्त
एटीएम बदलुन फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

धुळे Dhule। प्रतिनिधी

हातचालाखीने (Manipulate) एटीएम कार्ड (ATM card) बदलुन व क्लोनिंग (Changing and cloning) करुन वेगवेगळ्या बँक खात्यातील (Bank account) पैसे (money )परस्पर काढुन फसवणूक (Cheating) करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला (Interstate gang) एल.सी.बी. (LCB)च्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून विविध बँकांचे 66 एटीएम कार्ड, सात मोबाईल तसेच स्किमर मशिन जप्त केले आहे. यासंदर्भात चार जणांना ताब्यात (possession) घेण्यात आले असून यात एका बालकाचाही समावेश आहे.

यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना गुन्ह्याच्या कार्यपध्दती बाबत बारकाईने अभ्यास केला. यात संबंधित गुन्ह्यातील आरोपी हे याप्रकारचे गुन्हे हे सकाळच्या वेळी करीत असल्याचे निर्दशनास आले. त्या अनुषंगाने आरोपीने आदलाबदल केलेल्या एटीएमच्या आधारे ज्या-ज्या ठिकाणाहुन पैसे काढले. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले व तात्रिक बाबींची तपासणी केली असता अशा प्रकारचे गुन्हेगार हे हिसार (हरीयाणा) येथील असल्याचे निष्पन्न झाले.

आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार हरीयाणा पासिंगची एक्स.यु.व्ही कार (क्र एच.आर. 80 डी. 3982) ही मालेगावकडुन धुळयाकडे येत असल्याचे समजते. त्यामध्ये काही संशयास्पद व्यक्ती आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी चाळीसगावरोड चौफुली येथे सापळा लावुन कार व त्यातील चार संशयीत इसमांना ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणले.

विजयकुमार पालाराम राजपुत (वय 35), सुनिलकुमार धुपसिंग राजपुत (वय 32), शिवकुमार चंदकिशोर शर्मा (वय 38) अशी संशयितांची नावे असून याशिवाय एका विधी संघर्ष बालकाचाही समावेश आहे. हे सर्व सर्व बरवाला जि.हिसार हरीयाणा येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांची व कारची झडती घेतली असता 1 लाख 30 हजार 300 रुपये रोख, 20 हजार रुपये किंमतीचे 7 मोबाईल, 8 लाख रुपये किमतीची एक कार तसेच 6 हजार रुपये किंमतीचे एटीएम कार्ड स्वाईप व क्लोन करण्याचे स्किमर मशिन, 3 हजार रुपयाचे एटीएम कार्ड स्वाईप व क्लोन करण्याचे स्किमर मशिन व वेगवेगळया बँकेचे एकुण 66 एटीएम कार्ड असा एकुण 9 लाख 59 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

मुद्येमाल व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आरोपीतांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी देवपुरातील पंचवटी टॉवर जवळील एच.डी.एफ.सी. बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड हातचालाखीने बदलुन व क्लोनिंग करुन त्यांच्या बँक खात्यातील एकुण 3, लाख 80 हजार रुपये हे वेगवेगळया ठिकाणी असलेल्या एटीएम मशिन मधुन काढले असल्याची कबुली दिली. या संदर्भात देवपुर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.

त्या व्यतिरिक्त धुळे शहरात वेगवेगळया पाच ठिकाणाचे घटनांची कबुली दिलेली आहे. तसेच त्यांनी नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, नागपुर, यवतमाळ, धुळे तसेच मध्यप्रदेश, राज्यस्थान, गुजरात, हरीयाणा, उत्तरप्रनदेश, दिल्ली आदी राज्यतील वेगवेगळ्या ठिकाणावरुन सामान्य जनतेच्या अज्ञानाचा गैर फायदा घेवुन एटीएम कार्ड अदला-बदल करुन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. देवपुर पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल होवून तपास सुरु आहे.

Related Stories

No stories found.