जगात सर्वात उत्कृष्ट नेतृत्व भारताकडे- राष्ट्रसंत ओझा

जगात सर्वात उत्कृष्ट नेतृत्व भारताकडे- राष्ट्रसंत ओझा
राष्ट्रसंत रमेशभाई ओझासंग्रहीत छायाचित्र

धुळे । Dhule। प्रतिनिधी

समाजाद्वारेच देश आणखी बलवान होऊ शकेल. राष्ट्राची सेवा (Service to the nation) करणे लोकशाहीत (democracy) आपले दायित्व आहे. देशाला आणखी मजबूत बनवायचे असेल, तर न्यायदेवतेचा मान राखा, असे सांगतांनाच आज भारताने जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आता भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. जगात आज सर्वात उत्कृष्ट नेतृत्व (Excellent leadership) भारताकडे आहे. संसदेची पायरी चढण्याआधी दंडवत करणारा पंतप्रधान (Prime Minister) आम्ही यापूर्वी कधी पाहिला नाही. देशाची धुरा अशा नेतृत्वाकडे असू द्या, की नेतृत्व करणारा कोणाच्याही दबावाखाली येणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रसंत रमेशभाई ओझा (Rashtrasant Rameshbhai Ojha) यांनी केले.

राष्ट्रसंत  रमेशभाई ओझा
विधवा भावजयीला दिराने दिली जीवनसाथी म्हणून साथ

शहरातील हिरे भवनात महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचे रौप्य महोत्सवी 25 व्या प्रांतीय अधिवेशन झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात अग्रविभूषण व अग्रश्री पुरस्काराचे वितरण झाले. रमेशभाई ओझा पुढे म्हणाले, की चिंतनातून आपण समाजाची, राष्ट्राची प्रगती करू शकतो. त्यामुळे गरीबीशी नव्हे, तर गरीबांवर प्रेम करा. व्यक्तीने व्यक्तीच्या रुपात न राहता स्मार्ट ऑफ माय लाईफने जीवनपद्धती जगावी. आपणा सर्वांचे जीवन प्रोप्रायटर आहे. आमचा प्रत्येक अवयव इंद्रियांचा व्यापार आहे. ज्या मातेच्या उदरात वाढ झाली, त्या मातेचा कायमस्वरुपी आदर करण्याचे शिका.

तिच्या उपकारासारखे दुसरे काहीही नाही. भगवान श्रीरामाने अशिक्षित शबरीची स्तुती केली. शबरीची कुटिया आजदेखील भाविकांच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत असते. भगवान श्रीकृष्णाने सुदामासाठी अल्पावधीत सोन्याची द्वारका बसविली. दारिद्नय काही पूजनीय वस्तू नाही. त्यामुळे सर्वांचा सन्मान राखणे शिकले पाहिजे. भगवतगीता, रामायणाची करंगळी धरून आपण वावरत आहोत.

सर्वधर्मियांच्या उपासनेचा आम्ही आदर करतो. प्रथम आम्ही भारतीय आहोत, हे विसरू नका. एकता, समता आणि बंधुता हे सूत्र समाजात कायमस्वरुपी टिकून राहावे. धर्मश्रद्धा वंदनीय आहे. प्राणवायू जसा सर्वत्र असतो, तसा धर्मश्रद्धाळू अग्रवाल समाज सर्वत्र आढळतो. राष्ट्राला अधिक शक्तीशाली बनविण्यासाठी अग्रवाल समाजाने योगदान द्यावे, असेही आवाहन राष्ट्रसंत रमेशभाई ओझा यांनी केले.

राष्ट्रसंत  रमेशभाई ओझा
प्रेमविवाह केल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com